संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. भापजने 15 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे.या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे. दरम्यान, या निकालावर रोहित पवारांनी संपात व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपवर पैसे दिल्याचा आरोप केला आहे. रोहित पवारांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवारांची पोस्ट (Rohit Pawar Post)
जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.
आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते… मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही!
महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.