Grocery Food  Google
लाईफस्टाईल

Grocery: किराणामाल आरोग्याला घातक?तारीख बदलून ग्राहकांच्या जीवाशी खेळ

Grocery Food : सुपर मार्केटमधून पॅकेट फूड घेताय तर सावधान कारण तुम्ही अगदी निर्धास्थपणे विकत घेत असलेले अगदी नामांकीत कंपन्यांचे खाद्यपदार्थ कालबाह्य झालेले असू शकतात. आणि ते खाताच तुम्ही आजारीही पडू शकता. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.

Girish Nikam

तुम्ही आत्तापर्यंत दुधातील भेसळ, बोगस पनीर, चायनीज तांदूळ असे प्रकार अनुभवले असतील, ऐकले असतील...पण आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत त्याने तुमच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही. दुकानांमधून किंवा एखाद्या सुपर मार्केट मधून किराणा घेताना सावधान. कारण तुम्ही अगदी निर्धास्थपणे विकत घेत असलेले पॅकिंगमधील बँडेड खाद्यपदार्थ कालबाह्य झालेले असू शकतात.

कारण तुमच्या आरोग्याशी खेळण्याचा सर्रास प्रकार मुंबईत उघडकीस आलाय. एक्सपायर झालेले म्हणजेच मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवरील तारीख काढून तिथं चक्क नवी तारीख टाकून विक्री करण्याचा धक्कादाकाय प्रकार शिवडीतील एका गाळ्यात सुरू असल्याचा पर्दाफाश झालाय. मुंबईची आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनानं संयुक्तरीत्या ही कारवाई केली. नक्की कसा हा गोरखधंदा सुरु होता ते पाहूया.

मुंबईत कालबाह्य झालेल्या खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अगदी रोजच्या खाण्यातील खाद्यपदार्थांसोबत हा खेळ सुरू होता.

मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर नवीन तारीख छापून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु होता.

थिनरच्या मदतीने पॅकिंगवरील मूळ तारीख काढली जायची .

हॅन्ड हेल्ड प्रिंटरच्या मदतीने नवी तारीख छापली जायची.

अमूल, ब्रिटानिया, पेप्सी अशा नामांकित कंपन्यांच्या कालबाह्य पदार्थांची सर्रास विक्री होत होती

शिवडी येथील गाळ्यामधून सुमारे 9 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

बऱ्याचदा आपण ब्रँडेड कंपनीचं खाद्यपदार्थ एक्सपायरी डेट पाहून घेतो. मात्र हीच तारीख तुम्हाला आजारी पाडू शकते. मुंबईतील या धक्कादायक प्रकाराने गृहणींची झोप उडाली असेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT