शाकाहारामुळे लठ्ठपणा आणि डायबेटीज? संशोधनात धक्कादायक माहिती उघड

Veg Food : प्रक्रिया केलेलं अन्न आरोग्याला घातक आहे का? शाकाहारामुळे डायबेटीज होतो का? गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात, नेमकं सत्य काय?
Special Report on Veg Food
Special Report on Veg Food
Published On

Special Report on Veg Food : तुम्ही शाकाहारी असाल आणि त्यातही प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खात असाल तर सावधान...कारण एका ताज्या संशोधनातून शाकाहारामुळे लठ्ठपणा आणि डायबेटीस होण्याचा धोका समोर आला आहे. प्रक्रिया केलेलं अन्न आरोग्याला घातक आहे का? शाकाहारामुळे डायबेटीज होतो का? पाहूया या संशोधनावरील खास रिपोर्ट

कोणता आहार सर्वोत्तम यावरुन शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमध्ये नेहमीच वाद होत असतात. मानवी शरीराला काय हिताचं यावरुन जगभरात चर्चा झडत असते. मात्र तुम्ही जर शाकाहारी असाल तर ही बातमी तुमची झोप उडवेल....कारण शाकाहारी लोकांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहचा धोका वाढत असल्याचं संशोधनात समोर आलंय. त्याला कारण आहे 'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड'...

पारंपरिक खाद्यपदार्थ सोडून आपण जे चवीचं खातो त्याला 'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड' म्हणजेच प्रक्रिया केलेलं अन्न असं म्हणतात. मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोक प्रक्रिया केलेलं अन्न जास्त खातात. त्याचे दुष्परीणाम समोर आलेत. 'द लॅन्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मॅगेझिनमध्ये यावरचं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. नेमकं काय आहे हे 'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स' ते पाहूयात...

प्रक्रिया केलेल्या शाकाहारमुळे डायबेटीज

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम संयुगे, संरक्षक, चव वाढवणारे आणि इतर रसायने असतात. अशा अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स, सोडियम आणि साखर असते. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. ते रक्तातील साखर वेगाने वाढवतात आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर कॅलरीज, साखर आणि चरबी असते. यामध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे पचनावर परिणाम होतो. बद्धकोष्ठता सारख्या समस्या निर्माण होतात. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांचा अभाव असतो.

इंग्लंडमध्ये याबाबतचं संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये सुमारे दोन लाख लोकांनी सहभाग घेतला होता. वनस्पतींवर आधारित अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या संशोधकांनीही एक संशोधन केलंय. त्यामध्येही अति प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचं जास्त सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयरोगाबाबतचा धोका वाढतो. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी घरीच बनवलेलं ताजं अन्न खाणंच योग्य असून त्यामुळे तुम्ही फिट आणि आनंदीही राहाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com