Surya Gochar 2026 google
लाईफस्टाईल

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

Makar Sankranti: 2026 मध्ये सूर्याचा मकर राशीत प्रवेश चार राशींना मोठा फायदा देणार आहे. आर्थिक प्रगती, करिअरमधील संधी आणि यशाचे दरवाजे उघडणार आहेत.

Sakshi Sunil Jadhav

वर्ष संपायला फक्त २ महिने राहिले आहेत. अनेकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. गेलेल्या वर्षात काय मिळवले आणि येणाऱ्या वर्षात काय मिळवायचे आहे. याचे नियोजन करत असताना ग्रहांच्या हालचालींमुळे चार लकी राशींना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

ग्रहांच्या हालचालींनुसार 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा दिवस मकर संक्रांतीचा असून सूर्याचा हा गोचर सर्व 12 राशींवर प्रभाव टाकणार आहे. कारण सूर्य आणि शनि हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात, त्यामुळे हा बदल काही राशींना आव्हानात्मक तर काहींना अत्यंत शुभ फल देणारा ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या सूर्य गोचराचा सगळ्यात जास्त फायदा पुढील चार राशींना होणार आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जाणार आहे. या दिवसांमध्ये सामाजिक आयुष्यात मान-सन्मान वाढेल आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल. करिअरमध्ये मोठ्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पद वाढेल, तर व्यवसायात अचानक नफा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल आणि खर्चासोबतच बचत आणि गुंतवणुकीची संधी मिळेल. आरोग्य देखील चांगले राहण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशीसाठी हा गोचर संधी निर्माण करणारा ठरेल. जरी खर्च वाढू शकतो, तरी विविध मार्गांनी आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये प्रगती, भाग्याचा मजबूत साथ आणि व्यवसायात यश मिळू शकते. प्रेमसंबंध सुधारणार असून आरोग्य देखील उत्तम राहील.

मकर राशी

मकर राशीतच सूर्याचा गोचर होणार असल्याने या राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक धन लाभ, प्रगती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. मात्र याच कामाचा फायदा पुढील काळात मोठ्या यशाच्या रूपात मिळू शकतो. प्रवास करताना सावधगिरी आवश्यक आहे. शनिवारी हनुमान पूजन किंवा हवन करणे शुभ ठरेल.

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मकतेने भरलेला असेल. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि करिअरमध्ये मोठी प्रगती दिसू शकते. व्यवसायात नफा, आर्थिक वाढ, बचत आणि योग्य व्यवस्थापन यामुळे आर्थिक स्थैर्य मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि आरोग्य उत्तम राहील. 2026 मधील हा सूर्याचा गोचर अनेकांच्या जीवनात नवे परिवर्तन घेऊन येणार असून काही राशींसाठी तो रेड कार्पेट वेलकमसारखा यशाचा काळ ठरू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चॅट्स अन् व्हिडिओ हाती लागल्यानं बँक मॅनेजरचं गुपित लफडं आलं बाहेर; बायकोनं भरस्त्यात नवऱ्याला चोपलं

Goa Film Festival: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाचा डंका, 'या' दोन चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

Shepuchi Bhaji Recipe: मुगाची डाळ घालून बनवा शेपूची भाजी; नाक मुरडणारे पण चवीचवीनं खातील

Skin Care: हिवाळ्यात चेहरा साबणने धुण्याची सवय आहे? मग, होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

SCROLL FOR NEXT