Skin Care Tips, Beauty Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा ग्लो करायचीये? व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे असा करा वापर

Beauty Skin Care : उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनाचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

Vitamin E Capsules :

उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनाचा वापर करतो.

त्वचेला (Skin) ग्लोइंग किंवा मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी बहुतेक लोक चेहऱ्याशी संबंधित कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करु शकता. व्हिटॅमिन (Vitamins) ई त्वचा आणि केसांना सुंदर बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

जर उन्हामुळे तुमचा चेहरा टॅन झाला असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करायचा याचा फायदा (Benefits) काय? जाणून घेऊया

1. फेसमास्क लावण्यापूर्वी...

  • कोणताही फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा नीट धुवा. जर तुम्ही मेकअप केला असेल तर तो स्वच्छ करा. त्यासाठी क्लींजर किंवा फेस वॉशच्या मदतीने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

  • त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा सुकू द्या.

  • एका भांड्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि खोबऱ्याचे काही थेंब घालून चांगले मिक्स करा. खोबऱ्याच्या तेलाऐवजी तुम्ही गुलाबपाणी, कोरफड जेल किंवा बदामाचे तेल वापरु शकता.

  • कापसाच्या साहय्याने हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने मसाज करा.

  • फेस मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. चेहऱ्याला मॉइश्चरायझ करा.

2. व्हिटॅमिन ई फेस मास्क लावण्याचे फायदे

हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळते.

हार्मोनल चेंजेसमध्ये येणारे मुरुमे दूर होण्यास मदत होते.

त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो.

जर तुमचे ओठ काळे पडत असतील तर त्यावर सुद्धा हा फेस पॅक लावू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT