Maldives Travel Saam Tv
लाईफस्टाईल

Maldives Travel : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा मालदीवच्या बीचवर, इतका होईल खर्च

Maldives Tour Full Package, Booking Process Details in Marathi: उन्हाळ्याची सुट्टी लागली की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. अशावेळी आपण जवळपास असणारे काही ठिकाणे फिरण्यासाठी पाहातो. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर मालदीव हे त्यांच्या आवडीचे ठिकाण.

कोमल दामुद्रे

Maldives Tour Explained in Marathi :

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. अशावेळी आपण जवळपास असणारे काही ठिकाणे फिरण्यासाठी पाहातो. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर मालदीव हे त्यांच्या आवडीचे ठिकाण.

मालदिवमधील (Maldives) काही बी-टाउन स्टारचे फोटो दररोज व्हायरल होत असतात. माळवेड हे बहुतांश लोकांचे हनिमून डेस्टिनेशन बनले आहे. मालदीव हे लोकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी बजेटमध्ये प्रवास (Travel) करता येतो तसेच व्हिसाही सहज मिळतो.

1. माफुशी बेट

मालदीवमध्ये १०५ आयलंड रिसॉर्ट्स आहेत. या ठिकाणी असणारे हॉटेल्स थोडे महागडे आहेत. ज्यामुळे तुमचे बजेट गडबडू शकते. माफुशीच्या बेटाजवळ तुम्ही ट्रिपचा प्लान करु शकता. माफुशी हे मालदीवमधील सगळ्याच चांगले आणि स्वस्त रिसॉर्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला ४ ते ७ हजार रुपयांसाठी एका रात्रीचे भाडे आहे. ४ रात्री ५ दिवसांसाठी तुम्हाला साधरणत: ७० हजार रुपयांचा खर्च येईल.

2. या ठिकाणी फिरा

मालदिवमध्ये तुम्हाला कयाकिंग, फिशिंग, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि स्नॉर्कलिंग यांसारख्या अनेक ठिकाणी तुम्ही सुट्टी ऍन्जॉय करु शकता.

3. या गोष्टी महत्त्वाच्या

येथे जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, फोटो आणि व्हिसाची गरज लागेल. फिरायला जाण्यासाठी तुम्हाला महिनाभर व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुम्हाला फ्लाइट बुक करता येईल.

4. समुद्र

मालदीव हे रोमँटिक ड्रीम आयलँड डेस्टिनेशन आहे. जे समुद्रकिनाऱ्यांच्या (Sea) सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक लोक फिरायला जातात. तसेच या ठिकाणी कोरल, किरण, समुद्री कासव, रीफ शार्क आणि पाण्याखालील इतर अनेक प्रजातींच्या रंगीबेरंगी अॅरेमध्ये मुक्तपणे पोहता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT