Kakdi Lassi Saam TV
लाईफस्टाईल

Cucumber Lassi Recipe: 'काकडीची लस्सी' प्यायल्याने शरीराला मिळेल थंडावा; जाणून घ्या रेसिपी

Kakdi Lassi Recipe in Marathi: उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकरची लस्सी आपण आवडीने पितो. तर मग आज या लस्सीचे हेल्दी व्हर्जन जाणून घेऊयात. तुम्ही कधी काकडीपासून बनलेली लस्सी प्यायली आहे का?

Ruchika Jadhav

उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण वेगवेगळे थंडपदार्थ खात असतो. यामध्ये काकडी, दही, फळे, आइस्क्रिम, कोल्ड्रिंक, ताक, लस्सी अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकरची लस्सी आपण आवडीने पितो. तर मग आज या लस्सीचे हेल्दी व्हर्जन जाणून घेऊयात.

तुम्ही आजवर केसर, मँगो आणि विविध फ्लेवरमध्ये असलेली लस्सी प्यायली असेल. मात्र तुम्ही कधी काकडीपासून बनलेली लस्सी प्यायली आहे का? उन्हाळ्यात काकडीची लस्सी पिल्याने आरोग्याला याचे अनेक फायदे मिळतात. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तर दही शरीराला थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात पोटाला गारवाही मिळतो आणि शरीर हायड्रेटसुद्धा राहते. चला तर मग जाणून घेऊ थंडगार काकडीपासून बनणारी लस्सीची रेसिपी.

काकडीची लस्सी बनवण्यासाठी एक काकडी

दही

धणे पावडर

जिऱ्याची पावडर

चाट मसाला

काळी मिरी पावडर

काळं मीठ

कोथिंबीर

बर्फ इत्यादी

कृती

सर्वप्रथम लस्सी बनवण्यासाठी पुदिन्यांची पाने हाताने बारीक करा. दुसरीकडे एका भांड्यात दही घेऊन ते छान फेटून घ्या. त्यानंतर या दह्यामध्ये बारीक केलेली पुदिन्यांची पाने आणि थोड पाणी मिक्स करा. हे सर्व मिश्रण छान एकत्र करून झाल्यावर यामध्ये जिरे पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, धणे पावडर आणि काळ मीठ अॅड करा.

हे सर्व एकत्र करून एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर यात चार ते पाच बर्फाचे तुकडे अॅड करा. सगळ्यात शेवटी पुदिन्याच्या पानांनी लस्सीवर सजावट करावी. अशाप्रकारे तुमची थंडगार काकडीची लस्सी तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT