Suhana Sakal Swasthyam Saam Tv
लाईफस्टाईल

Suhana Sakal Swasthyam : मानसिक आरोग्याबाबत मदत करणार 'स्वास्थ्यम् सकाळ', राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

Sakal Swasthyam Program : मानसिक आरोग्यासाठी आणि संपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी सगळ्यासाठी उपयुक्त तसेच मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव यंदा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडीत फार्ममध्ये आयोजित करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sakal Swasthyam :

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या आणि सर्व वयोगटातील नागरीकांना शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी आणि संपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी सगळ्यासाठी उपयुक्त तसेच मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव यंदा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडीत फार्ममध्ये आयोजित करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टिस्टेट)’, ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आहेत. तसेच सहयोगी प्रायोजक ‘चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.’ व फिनोलेक्स केबल्स लिमिटेड असून, ईव्ही पार्टनर (Partner) एथर आहेत.

यंदा आयोजित केलेल्या या तीन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून ध्यान-धारणा, योग-प्राणायाम, शारीरिक, भावनिक व मानसिक स्वास्थ्यपूर्ण आरोग्य, अध्यात्म आणि आरोग्य (Health), वैदिक व संस्कृत मंत्र उच्चारण आणि महत्त्व अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (International) स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत.

दरम्यान, या उपक्रमांतर्गत ‘समग्र सृष्टीचे कल्याण’ आणि ‘माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

'स्वास्थ्यम' का?

मंत्रांचा जप, आरोग्य आणि संस्कृत व वैदिक

आपले शरीर चक्रांनी बनलेले असते. काही मंत्राचा जप केल्याने शरीरातील चक्रे सक्रिय होतात. ही चक्रे शरीरातील ऊर्जा केंद्रे असतात. संस्कृत व वैदिक मंत्रांचा नियमित जप केल्याने चक्रांमध्ये संतुलन निर्माण होण्यास मदत होते. नियमित मंत्राचा जपा केल्यामुळे मनुष्याची एकाग्रता वाढते, हृदयाचे स्पंदने नियमित होऊन हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

ध्यान-धारणाविषयी शास्त्रीय माहिती जाणून घ्या

ध्यान-धारणा केल्यामुळे आपल्या मनात असलेले ताण-तणाव दूर होऊन, मन प्रसन्न, चिंतामुक्त आणि काळजीमुक्त होते. ध्यान-धारणेच्या सराव केल्याने चालू वर्तमान काळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये व आपल्या गुणांची आपल्याला जाणीव होण्यास मदत होते. नियमित ध्यान-धारणा केल्याने आपल्या मनामध्ये एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते. ध्यान-धारणा हा एक मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. मेंदूचे कार्य संतुलित राहण्यासाठी नियमित ध्यान-धारणा आवश्यक आहे.

निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्यासाठी योगासने आणि प्राणायाम करा

ताण-तणाव आणि मानसिक विकार यांसारखे आजार कायमचे व समूळ नष्ट करण्यासाठी योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्येवर योगसाधना हा योग्य उपाय आहे.

मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचं संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. ‘योग’ शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक यांचा यात समावेश होतो. तसेच, श्वास हा आपल्या शरीरातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. योगसाधनेत केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व आपले शरीर आणि मन संतुलित करतो.

अध्यात्म आणि आरोग्य यांचे संबंध काय?

अध्यात्म मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो. स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरीक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध काय?

आधुनिक काळातील वैद्यकशास्त्रातसुद्धा संगीत कलेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कर्करोग, किडनी विकार-डायलिसिस, हृदयविकार अशा व्याधींच्या उपचारांबरोबर संगीत उपचार व संगीत चिकित्सा किती उपयोगी ठरते यावर संशोधन सुरू आहेत. संगीत मनाला शांत, प्रसन्न व स्थिर करते. भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध ‘राग’ यांचा रक्तदाब, ताण-तणाव, नैराश्य याशिवाय अनेक व्याधींवर सकारात्मक परिणाम होतो व वेदनेपासून आराम मिळण्यास मदत होते.

खालील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भेट द्या...

Instagram - instagram.com/globalswasthyam

Facebook - facebook.com/globalswasthyam

Twitter - twitter.com/GlobalSwasthyam

1 ते 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी globalswasthyam.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. उपक्रमात प्रवेश विनामूल्य असून, उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.

हे लक्षात ठेवा

ज्येष्ठ नागरिकांसाठी खालील ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उपक्रमाच्या मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. (ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी प्रवेशिका घेण्याची आवश्यकता नाही.)

येथे मिळतील प्रवेशिका

सर्व वयोगटातील नागरिकांसाठी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासह शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व संपूर्ण निरोगी जीवनशैलीसाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव 1 ते 3 डिसेंबरदरम्यान म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VBA News : आधी काळे फासले, मग चाबकाने केली मारहाण; केज मतदारसंघातील घटनेने खळबळ | VIDEO

History of Tea: 'चहा' भारतात कधी आणि कसा पोहोचला तुम्हाला माहिती आहे का?

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण

EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT