Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

jaykumar gore news : सोलापूर-गोवा विमान सेवेवरून मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते सोलापुरात बोलत होते.
jaykumar gore
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

सोलापूर शहरातून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाल्यामुळे काहींना चुकीचे काहीतरी घडेल असे वाटत होते. परंतु तसे काही घडलेले नाही. ऑगस्टमध्ये मुंबईची विमानसेवा सुरू होईल. त्यानंतर तिरूपतीसाठी सुरू होईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी कर्णिक नगर येथे 14 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, आमदार म्हणून देवेंद्र कोठे शहरातील विविध समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत असतात. पाणीपुरवठ्याचा प्रश्न झाला की त्यांनी विमानसेवेबद्दल पाठपुरावा केला. आता गोव्याची विमानसेवा झाल्यानंतर मुंबईची सेवा सुरू करा, म्हणून सांगितले. मुंबई विमान सेवा ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. तिरूपतीसाठी होणार आहे.

jaykumar gore
Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गोवा विमानसेवेमुळे तस्करी वाढेल, अशी भीती व्यक्त केली होती. खासदार शिंदे यांचे नाव न घेता पालकमंत्र्यांनी गोवा विमानसेवेमुळे असे काही घडले नाही, असा टोला लगावला.

jaykumar gore
Shailesh Jejurikar : मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G ला 'भारतीय' नेतृत्व; मराठमोळे शैलेश जेजुरीकर कोण आहेत? VIDEO

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदावर भाजपचा दावा

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूर शहरातील विकास कामाचा भाजप नेत्यांकडून झपाटा लावला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदावर भाजप पक्षाकडून आताच दावा सांगितला जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून महायुतीतून भाजपचाच महापौर करण्याचा निर्धार केला आहे. सोलापूर शहर भाजपकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com