
मुंबई महापालिकेची भांडुपमधील मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.
मराठी शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे स्थलांतराच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.
स्थानिक नागरिक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळा वाचवण्याचा प्रयत्न केला.
मयूर राणे, साम टीव्ही
मुंबई : राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला जात आहे. त्यानंतर सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे मराठी भाषेचा मुद्दा राजकीय नेत्यांनी लावून धरलेला असताना ठाण्यानंतर आता मुंबईतही एक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यावरून याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारच्या अनास्थेमुळे आणखी एक सरकारी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात १९७१ साली सुरू झालेली पालिकेची मराठी शाळा बंद मूळ ठिकाणी बंद झाली. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना ३ किमी दूर पालिकेच्या शाळेत पाठविण्यात आलं. यावरून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खिंडीपाडा मनपा मराठी शाळेत शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी होते. मात्र या शाळेची इमारत धोकादायक झाली. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी मिळत नसल्याचे कारण देत पालिकेने एका खासगी जागेत काही दिवस शाळा भरवली. तिथून आता ही शाळा पुढे तुळशीपाडा इथे स्थलांतरित केल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी इतर पर्याय स्वीकारले आहेत.
आदिवासी आणि कष्टकरी विभाग असलेल्या खिंडीपाडामधील ही शाळा येथील मराठी माणसांचा आधार असल्याने ती बंद पडू नये म्हणून स्थानिक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रयत्न केले. मात्र आता शाळा बंदच होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ठाण्यातील नौपाड्यातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टच्या शाळेतील मराठी माध्यमांची बंद होऊन इंग्रजी माध्यम सुरु होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांसह मनसे नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.