Sugarcane benefits for skin and hair, Sugarcane benefits in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Care : उसाच्या रसाचे सेवन केल्यास वाढू शकते तुमचे सौंदर्य !

उसाचा रस केस आणि त्वचेसाठी असा आहे फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. उसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट, खनिजे, प्रथिने, लोह, जस्त, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे आदी अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय त्वचेची निगा आणि केसांची निगा राखण्यासाठी याचा वापर केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. त्वचेच्या (Skin) समस्यांवर मात करण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन करू शकता. याशिवाय केसांच्या कोणत्या समस्या तुम्ही उसाच्या रसाच्या मदतीने दूर करू शकता. (Sugarcane benefits in Marathi)

हे देखील पहा -

उसाच्या रसाचे फायदे कसे होतात हे जाणून घेऊया.

१. मुरुमांपासून मुक्तता -

उसाचा रस नियमित प्यायल्यास मुरुमांची समस्या आटोक्यात ठेवता येते. उसाच्या रसामुळे चेह-यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते, ज्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते. मुलतानी मातीमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सच्या (Pimples) समस्येपासून आराम मिळू शकतो.

२. सुरकुत्यापासून सुटका -

उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात जे त्वचेला रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. तसेच त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यासही मदत करते. उसाचा (Sugarcane) रस चेहऱ्यावर लावून काही वेळाने धुतल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

३. डाग काढून टाकण्यासाठी मदत -

उसाच्या रसामध्ये ग्लायकोलिक ऍसिड असते जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. कापसाच्या साहाय्याने उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच डाग कमी होऊ लागतात.

४. केसांची वाढ -

उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते जी केसांना नैसर्गिक कंडिशनिंग म्हणून काम करते. तसेच टाळूचे पोषण होण्यासही मदत होते. याशिवाय टाळूचा कोरडेपणाही दूर करते. उसाचा रसात दही मिसळून केसांना लावू शकता.

अशाप्रकारे उसाच्या रसामुळे सौंदर्य वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

SCROLL FOR NEXT