Shruti Vilas Kadam
बदाम, काजू किंवा मनुका खूपच चमकदार दिसत असतील, तर त्यांच्यावर तेलाचा थर किंवा रंग लावलेला असू शकतो.
ड्रायफ्रूट्सचा रंग नैसर्गिक आहे का हे तपासा. ड्रायफ्रूट्सचा रंग भडक किंवा एकसारखा असल्यास सावध राहा. त्यावर केमिकल रंग लावलेला असू शकतो.
ड्रायफ्रूट्स स्वच्छ पांढऱ्या कापडाने हलक्या हाताने पुसा. कापडावर वेगळा रंग किंवा तेलकटपणा जाणवला तर ते ड्रायफ्रूट्स भेसळ असू शकतात.
चांगल्या ड्रायफ्रूट्समध्ये थोडासा नैसर्गिक, सौम्य वास असतो. आंबट, कुबट, शिळा किंवा रासायनिक वास येत असल्यास ते खरेदी करणे टाळा.
बदाम आणि काजू घट्ट व नैसर्गिक पोताचे असावेत. मनुका आणि खजूर किंचित मऊ असू शकतात; मात्र त्यांच्यावर अनैसर्गिक चिकटपणा, ओलसरपणा किंवा बुरशी दिसल्यास हे ड्रायफ्रूट्स फरेदी करु नका
पॅकबंद ड्रायफ्रूट्स खरेदी करताना FSSAI परवाना क्रमांक, पॅकिंगची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ तपासा. पॅकेट फाटलेले किंवा सील उघडलेले नाहीत ना हे देखील तपासा.
ड्रायफ्रूट्स खरेदी करताना ओळखीच्या दुकान किंवा ब्रँडला प्राधान्य द्या. उघड्यावर ठेवलेले, धूळ साचलेले किंवा ओले असलेले ड्रायफ्रूट्स टाळा.