Car paint protection: कारचा रंग आणि चमक टिकवायचीये? या 7 टीप्सने गाडी वाटेल नवी कोरी

Surabhi Jayashree Jagdish

कार धुणं

कार धुण्यासाठी नेहमी कारसाठी बनवलेला चांगल्या दर्जाचं डिटर्जंट वापरा. कपडे धुण्याचा साबण किंवा भांडी घासण्याचं लिक्विड वापरणं टाळा. कारण त्यामुळे पेंटवरील संरक्षणाचा थर खराब होऊ शकतो.

How to protect car paint | saam tv

कडक ऊन

कार जास्त वेळ कडक उन्हात उभी ठेवल्याने तिच्या पेंटची चमक कमी होऊ शकते. सूर्याच्या अतिनील (UV) किरणांचा सतत परिणाम झाल्याने रंग फिका पडू शकतो. त्यामुळे शक्यतो कार सावलीत किंवा झाकलेल्या पार्किंगमध्ये उभी करा.

Car paint shine | saam tv

वॅक्स पॉलिश लावा

कार धुऊन आणि व्यवस्थित कोरडी करून घेतल्यानंतर वॅक्स पॉलिश लावल्याने पेंटवर संरक्षणाचा थर तयार होतो. हा थर पेंटवर थेट होणारा उन्हाचा परिणाम कमी करण्यास मदत करतो. कारच्या पेंटची चमक टिकवण्यासाठी वॅक्स पॉलिशच्या उत्पादनावर दिलेल्या सूचनांनुसार त्याचा वापर करा.

Protect car paint from sunlight | saam tv

पेंट प्रोटेक्शन फिल्म (PPF)

पेंट प्रोटेक्शन फिल्म म्हणजे कारच्या बाहेरील पेंटवर लावलं जाणारं पारदर्शक आवरण असतं. यामुळे लहान दगडांचं कण, हलके ओरखडे आणि इतर बाह्य गोष्टींमुळे पेंटचं होणारं नुकसान कमी होण्यास मदत होते.

Car washing tips | saam tv

झाडाखाली कार उभी करणं

झाडाखाली कार उभी केल्यावर तिच्यावर पानं, चिकट द्रव किंवा पक्ष्यांची विष्ठा पडू शकते. पक्ष्यांची विष्ठा आणि झाडाचा डिंक जास्त वेळ पेंटवर राहिल्यास रंगाच्या थरावर डाग पडू शकतात किंवा पेंट खराब होऊ शकतो.

Car wax polish | saam tv

कार कव्हर वापरा

कार बराच वेळ बाहेर उभी ठेवायची असल्यास योग्य आकाराचं कार कव्हर वापरा. यामुळे धूळ, झाडांची पानं आणि पक्ष्यांच्या विष्ठेपासून पेंटचं संरक्षण होण्यास मदत होते. कव्हर घालण्यापूर्वी कार आणि कव्हरच्या आतील बाजू स्वच्छ ठेवा.

Protect car paint from bird droppings | saam tv

कारच्या बॉडीवरील ओलावा

पावसात कार भिजल्यानंतर किंवा गाडी धुतल्यानंतर तिच्या बॉडीवर पाणी साचून राहू देऊ नका. पेंटला आधीच नुकसान झालं असेल किंवा धातूचा भाग उघडा पडला असेल तर ओलाव्यामुळे गंज लागण्याचा धोका वाढू शकतो.

Prevent rust on car body | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Car Engine Oil | saam tv