Eye Care : खोट्या आयलॅशेजमुळे बिघडू शकते डोळ्यांचे सौंदर्य !
मुंबई : डोळ्यांमुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते. त्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक दिसू लागतो. लग्न समारंभात, पार्टी (Party) किंवा इतर काही कार्यक्रमात आपण आवर्जून मेकअप करतो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी त्यावर अनेक प्रकारची रंगरंगोटी करतो परंतु, डोळ्यांची सुंदरता वाढते ती आपल्या पापण्यांच्या हालचालींमुळे. या बोलक्या आणि सुंदर डोळ्यांना जर खोट्या पापण्या लावल्या तर डोळे (Eye) काही काळ सुंदर दिसू शकतात. पण त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला माहित असायला हवे. (How to care your eyelashes)
हे देखील पहा -
बनावट पापण्या डोळ्यांना सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करतात. यामुळेच आपल्याला विशेष प्रसंगी वापरायला ते अधिक आवडते. परंतु, केमिकलयुक्त आयलॅश ग्लू डोळ्यांना किती नुकसान पोहोचवते हे जाणून घेतल्यास, कदाचित तुम्ही त्याचा वापर कमीत कमी कराल.
बनावट पापण्या डोळ्यांना कशाप्रकारे नुकसान पोहचवू शकतात.
१. डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते –
कधी कधी लांब पापण्यांमुळे डोळ्यांभोवती जळजळ आणि खाज सुरू होते. परंतु, बनावट पापण्या लावताना वापरल्या जाणार्या ग्लूची ऍलर्जी असू शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास पापण्यांभोवती लालसरपणा, मुरुम येण्याची समस्या उद्भवू शकते.
२. संसर्गाचे कारण -
उन्हाळ्यात घामामुळे बॅक्टेरियाचा प्रसार झपाट्याने होतो. बनावट पापण्यांच्या बाबतीतही असेच आहे. घामामुळे वाढणाऱ्या बॅक्टेरियामुळे डोळ्यांना खाज सुटणे आणि लालसरपणा येऊ शकतो. याशिवाय एकच आयलॅश इतर व्यक्तीही वापरत असतील तर, त्यामुळेही डोळ्यांच्या संसर्गाला सामोरे जावे लागू शकते.
३. नैसर्गिक पापण्या खराब होऊ शकतात -
खोटे (Fraud) आयलॅश आणि त्याचा ग्लू वापरल्याने त्यांच्या नैसर्गिक पापण्यांचे नुकसान होते. त्यामुळे नैसर्गिक पापण्यांची वाढ थांबते. तसेच, बनावट आयलॅशमुळे नैसर्गिक पापण्या गळून पडतात.
४. अति वापरामुळे डोळे सुजतात -
आयलॅशसाठी वापरला जाणाऱ्या ग्लूमधे फॉर्मल्डिहाइड असते. वारंवार आणि दीर्घकाळ वापरल्या जाणाऱ्या बनावट पापण्यांमुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात सूज येऊ शकते.
५. कोरड्या डोळ्यांची समस्या वाढू शकते -
आपण स्वस्त, कालबाह्य किंवा अतिप्रमाणात सौंदर्यप्रसाधने वापरतो तेव्हा कोरड्या डोळ्यांची समस्या वाढते. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, अंधुक दिसणे, प्रकाश सहन न होणे अशा समस्या दिसू लागतात.
अशाप्रकारे खोट्या आयलॅशेजपासून दूर राहा आणि डोळ्यांची सुंदरता वाढवा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.