सुती कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

सुती कपड्यांची चमक कशी टिकवून ठेवाल.
How to care cotton clothes, how to wash cotton clothes, Tips and Tricks to wash cotton clothes
How to care cotton clothes, how to wash cotton clothes, Tips and Tricks to wash cotton clothesब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या सर्वांना आराम देणारे कापड म्हणजे सुती कापड. याचे महत्त्व असे की, हे नवजात, लहान मुले आणि वृद्ध लोकांसाठी सर्वात सोयीचे कपडे असतात. सिल्क फॅब्रिक वापरणे जितके सोपे असते तितकेच त्याची चमक टिकवून ठेवणे कठीण. मलमल, तागाचे कापसापासून बनवलेले ड्रेस मटेरियल महाग तर असतेच त्यामुळे त्यांना धुणे आणि सुकविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. (How to care cotton clothes)

हे देखील पहा-

सुती कपडे उन्हाळ्यात वापरण्यासाठी खूप आरामदायी असतात. यामुळे उन्हाळ्यात गर्मीपासून थोड्या प्रमाणात सुटका होते. जाणून घ्या काही सोप्या टिप्स (Tips), ज्यामुळे कॉटनचे (Cotton) कपडे दीर्घकाळ चमकदार राहण्यास मदत होईल.

सुती कपडे धुणे-सुकवणे आणि दीर्घकाळ नवीन ठेवण्यासाठी काही टिप्स

१. ड्रेस धुण्याआधी बहुतेक वेळा त्यावरील वॉशिंग लेबलकडे लक्ष द्या.

२. कपड्यांचा दुर्गंध टाळण्यासाठी परफ्युम्ड क्लॉथ कंडिशनर वापरत असाल तर ते शक्यतो टाळा. त्यामुळे कपडे निस्तेज होऊ शकतात.

३. सुती कपडे कोमट पाण्यात (Water) धुण्याची चूक अनेकजण करतात. त्यामुळे ड्रेसचा रंग फिका होऊन ते जुने दिसू लागतात.

How to care cotton clothes, how to wash cotton clothes, Tips and Tricks to wash cotton clothes
Fashion Tips :अशी करा साड्यांवर दागिन्यांची निवड..!

४. तासनतास मशीनमध्ये सुती कपडे इतर कपड्यांसोबत धुण्याची चूक करू नका. असे केल्याने कपडे लवकर जुने दिसू लागतात.

५. सुती कपड्यांवर डाग पडल्यास, मजबूत डिटर्जंटने घासण्याऐवजी ते नाजूक द्रव डिटर्जंटमध्ये काही तास भिजत ठेवा.

६. अधिक काळ रंग आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी त्यांना नेहमी हलक्या सूर्यप्रकाशात वाळवा. तसेच धुतल्यानंतर मशीनमध्ये फिरणे टाळा.

७. दोरी किंवा लोखंडी तारेवर सुती कपडे वाळवू नका. त्यामुळे ड्रेसवर वायरीचा गंज लागू शकतो.

उन्हाळा सुरू असताना घेतलेले कपडे एक ते दोन महिन्यांच्या वापरात इतके निस्तेज दिसतात की ते घालावेसे वाटत नाहीत. जर तुम्हीही रंग, सैल बाही आणि फ्रिज स्टिचिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर या टिप्स नक्की वापरा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com