अन्नामध्ये कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरते. मीठ असो वा साखर, दोन्हीचे अतिप्रमाण आरोग्यास हानी पोहोचवतं आणि अनेक गंभीर आजारांचा जन्म होतो. काहींना मिठाई खायला खूप आवडते, इतकं की खाल्ल्यानंतर गोड खाल्लं नाही तर तृप्त होत नाही. पण तुम्हालाही जास्त गोड खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जास्त साखर खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात?
जास्त साखर खाल्ल्याने हे आजार होऊ शकतात:
हृदयविकार : साखरेच्या अतिसेवनाने हृदयविकार वाढतात. जे लोक जास्त थंड पेय पितात त्यांची भूक नियंत्रित राहत नाही, ज्यामुळे वजन वाढतं आणि हृदयाचे आजार होतात.
मधुमेह : जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खालावते, त्यामुळे मधुमेहासारख्या आजारांचा धोकाही वाढतो. याशिवाय टेंशन, मूड बदलणे, डोकेदुखी यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
उच्च कोलेस्टेरॉल : साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. आतापर्यंत अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. त्याने वजन सुद्धा वाढतं. त्यासाठी आपण रोजच्या खाण्याच्या सवयीत वेळीच बदल करणे आवश्यक आहे.
लठ्ठपणा झपाट्याने वाढतो : साखरेचे अतिसेवन तुम्ही लठ्ठपणाचे शिकार बनवू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असाल पण साखर खाणं बंद केले नसेल तर तुम्ही तुमचे वजन कधीही नियंत्रणात ठेवू शकणार नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात सेवन सुरू करावे लागेल.
कर्करोगाचा धोका : साखरेचे अति सेवन सूज निर्माण करू शकते, ज्यामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
मेटाबॉलिक सिंड्रोम : साखरेमुळे इंसुलिन प्रतिरोधकता वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा धोका असतो.
मूड स्विंग आणि थकवा : साखरेचे प्रमाण वाढल्याने ऊर्जेच्या पातळीत चढ-उतार होतात, ज्यामुळे मूड स्विंग्स आणि थकवा जाणवतो.