लाईफस्टाईल

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

Silent Cancer Warning: पॅन्क्रियाटिक कॅन्सर हा सायलेंट किलर मानला जातो. अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, पिवळसरपणा, वेदना आणि अचानक डायबिटीस ही त्याची सुरुवातीची दुर्लक्षित लक्षणं आहेत.

Sakshi Sunil Jadhav

  • पॅन्क्रियाटिक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं साधी वाटल्याने निदान उशिरा होतं.

  • अचानक वजन कमी होणे आणि जॉन्डिस हे गंभीर संकेत आहेत.

  • अचानक डायबिटीस होणे हेही धोक्याचं लक्षण मानलं जातं.

पॅन्क्रियाटिक कॅन्सर हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कारण त्याची लक्षणे सुरुवातीला फारशी जाणवत नाहीत. बऱ्याचदा हा कॅन्सर शरीरात वाढल्यानंतरच तपासण्यात येतो. यामुळे उपचार कठीण होतात आणि रुग्णाचा जीव जाण्याचा धोका वाढू शकतो. यामध्ये तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जाणवतात. याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र डॉक्टरांच्या मते, या संकेतांकडे वेळेत लक्ष दिले तर जीव वाचू शकतो आणि उपचार शक्य होतात.

पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणे

पॅन्क्रियाटिक कॅन्सरची सर्वात पहिली लक्षणं म्हणजे अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे. हा बदल आहारात किंवा शारीरिक हालचालीत बदल न करता दिसतो. पॅन्क्रियासमध्ये तयार होणाऱ्या डाइजेस्टिव एन्झाईम्समध्ये बिघाड झाल्यामुळे शरीराला पोषक तत्वं व्यवस्थित शोषता येत नाहीत आणि असे रुग्ण थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं.

दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे काविळ . जेव्हा वाढणारा ट्यूमर पित्तवाहिनीवर दाब देतो तेव्हा शरीरात बिलीरुबिन वाढतो आणि त्यामुळे डोळे व त्वचा पिवळी दिसू लागते. काही रुग्णांमध्ये त्वचेची खाज, गडद रंगाचं लघवी आणि फिकट रंगाच्य शौचाचाही त्रास होतो.

अनेक लोकांमध्ये पोटदुखी किंवा पाठदुखी वेळोवेळी येते-जाते, त्यामुळे हे लक्षण सामान्य मानलं जातं. पण महिने किंवा वर्षभर अधूनमधून होणारी ही वेदना नंतर कॅन्सर असल्याचे आढळल्याची अनेक उदाहरणं संशोधनात नोंदली गेली आहेत.

चौथं आणि ओळखण्याजोगं लक्षण म्हणजे अचानक डायबिटीस होणे किंवा आधी असलेल्या डायबिटीसमध्ये अचानक वाढ होणे. पॅन्क्रियास इन्सुलिन नियंत्रित करत असल्यामुळे ट्यूमरमुळे होणाऱ्या बदलांचा परिणाम सरळ रक्तातील साखरेवर होतो. जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीसचा इतिहास नसेल आणि वय ५० वर्षांपेक्षा अधिक असेल तर ही बाब गंभीर असू शकते.

टीप: हा लेख फक्त माहिती देण्यासाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणत्याही लक्षणांवर उपचार किंवा निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: 'तू भारतीय नाही तर चिनी आहेस...', शांघाय विमानतळावर महिलेचा १८ तास छळ

12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Face glow: चेहऱ्यावर ग्लो हवाय? थंडीच्या दिवसात हा ज्युस देईल तुम्हाला चमकदार त्वचा

Apple With Black Salt : सफरचंदावर काळे मीठ टाकून खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT