Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Sakshi Sunil Jadhav

खास जेवणाचा बेत

घरात चपाती, पराठा रोज बनत असला तरी वीकेंडला किंवा खास प्रसंगी गरमा-गरम गोल आणि फुगलेली पुरी खाण्याचा वेगळाच आनंद असतो. मुलं असो किंवा मोठे, पुरी आणि भाजी हा ब्रेकफास्ट किंवा लंचमधला परफेक्ट कॉम्बिनेशन मानला जातो.

Coconut Puri | yandex

पुऱ्या करताना होणाऱ्या चूका

पुऱ्या करताना त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत, कडक होतात, फुगत नाहीत, खूप तेलकट होतात. अशावेळी हा एक छोटी स्वयंपाकघरातील ट्रिक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Bhoplyachi Puri

सिक्रेट पदार्थ

पुरीसाठी पीठ मळताना १ ते २ चमचे तांदळाचे पीठ मिसळा. त्यामुळे पुरी कमी तेल शोषते आणि सुंदर फुलते.

Bhoplyachi Puri

तांदळाच्या पीठाचे फायदे

तांदळाचे पीठ गव्हातील ग्लूटेन कमी करते, ज्यामुळे पीठ खूप मऊ किंवा चिकट राहत नाही.

Rajgira Puri Recipe | Google

पुर्‍या बनतात कुरकुरीत आणि गोल

तांदळाचे पीठ पुर्‍यांना परफेक्ट शेप आणि टेक्स्चर देते, ज्या बाजारातील पुर्‍यांसारख्या दिसतात.

Puri Recipe | Google

तेल कमी लागते

पुरी जास्त तेल शोषत नाही, त्यामुळे ती अधिक हेल्दी होते आणि तळताना तेल वाचते.

Puri | yandex

गार झाल्यावरही मऊ राहते

पुरी थंड झाल्यावर कठीण होण्याची समस्या चावलाच्या पिठामुळे कमी होते. पीठात तेल किंवा तूप वापरल्याने पुर्‍यांना softness मिळतो आणि तळताना चिकटतही नाहीत.

why does chapati dough become black | yandex

पाणी कमी वापरा

पुरीचे पीठ थोडं घट्ट हवं. जास्त पाणी वापरल्यास पुरी मऊ होऊन तेल जास्त पिते.

Perfect Puri recipe | yandex

गरम तेलातच पुरी तळा

तेल पुरेसं गरम नसेल तर पुरी तेलात भिजते आणि फुलत नाही. बेलताना पीठावर मैदा किंवा चावलाचं पीठ वापरा. त्याने पुरी नीट लाटली जाते आणि तळताना गोल फुलते.

puri | yandex

NEXT: या ४ चूकांमुळे घरात येते गरिबी, हातात पैसा टिकत नाही; चाणक्यांनी सांगितले सत्य

financial problems astrology
येथे क्लिक करा