Sakshi Sunil Jadhav
भारताचे महान अर्थशास्त्री आणि चाणक्य निती ग्रंथाचे लेखक आचार्य चाणक्य यांनी जीवन, धन, संस्कार आणि व्यवस्थापनाबाबत अनेक महत्त्वाचे मार्गदर्शन दिले आहे. चाणक्यांच्या मते, गरीबी येण्यापूर्वी काही संकेत दिसतात. हे संकेत दुर्लक्ष केले तर घरात दरिद्रता वाढते आणि पैशाचा प्रवाह कमी होतो.
जर घरातील तुळशीचे रोप अचानक सुकू लागले किंवा पिवळे पडले, तर ते आर्थिक संकटाचे संकेत मानले जातात .तुळशीचे रोप लगेच खराब होणे म्हणजे धनची हानी होणे आणि दारिद्र येणे.
घरात रोज कारण नसतानाही तंटे, भांडण, राग आणि कलह सुरू होत असल्यास ते घरातील ऊर्जा असंतुलित झाल्याचे चिन्ह आहे. अशा घरात पैशाचा स्थिर प्रवाह राहत नाही.
ज्या घरात महिला आणि ज्येष्ठांचा सन्मान केला जात नाही, त्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. चाणक्य म्हणतात, स्त्रीचा अपमान म्हणजे आलेले धन गमावणे आहे.
घरातील लोक पूजा, प्रार्थना आणि अध्यात्मापासून दूर गेले तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. पैशाचे आगमन जरी झालं तरी तो टिकत नाही.
चाणक्यांच्या मते अस्वच्छ आणि कचरा भरलेल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. स्वच्छता ही समृद्धीची पहिली गुरुकिल्ली आहे.
घरात दररोज लावलेला दिवा अचानक विजत असेल किंवा वारंवार बिघडत असेल तर हे अशुभ ऊर्जा प्रवेशाचे संकेत आहेत.
तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी सदैव काही नाणी किंवा लक्ष्मीचे प्रतीक ठेवणे शुभ मानले जाते. ते रिकामे राहिल्यास धनाचा प्रवाह कमी होतो.
जिथे जास्त राग, शिव्या आणि दुखावणारे शब्द वापरले जातात, तिथे धन तिचा मार्ग बदलतो. तुटलेली वस्तू घरात ठेवणे, जळलेली वस्तू वापरणे अशुभ मानले जाते आणि धनहानी वाढवते.