How to choose jewelery on banarsi saree, fashion tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

बनारसी साडीसोबत या अॅक्सेसरीजची स्टाईल करा

प्रत्येक शुभ कार्यात किंवा महत्त्वाच्या प्रसंगी अनेक महिला वर्ग साडी नेसतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साडी हा भारतीय परंपरेतील विशेष पोशाख आहे. प्रत्येक शुभ कार्यात किंवा महत्त्वाच्या प्रसंगी अनेक महिला वर्ग साडी नेसतात.

हे देखील पहा -

साड्यांमध्ये केवळ रंग किंवा प्रिंट्समध्ये वेगळेपण मिळत नाही तर आपल्याला वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्येही साड्याही मिळतात, ज्यामुळे आपला प्रत्येक लुक खास बनतो. हल्ली कोणत्याही कार्यक्रमात किंवा विशेष प्रसंगी स्त्रिया बनारसी किंवा सिल्क बनारसी साडी नेसतात. बनारसी साडीमध्ये आपला लूक पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या अॅक्सेसरीजकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे. बनारसी साडीसोबत कोणत्या अॅक्सेसरीज छान दिसतील हे पाहूया.

१. हल्ली बाजारात नवनवीन ट्रेंडनुसार ज्वेलरी मिळतात. जर आपण बनारसी साडी नेसत असू तर त्यावर मंदिर शैलीतील नेकलेसपासून ते कानातल्यांपर्यंत कोणताही लूक छान दिसेल. कौटुंबिक समारंभ किंवा लग्न (Wedding) समारंभासाठी बनारसी साडीसोबत आपण सोन्याचे (Gold) टोन्ड जडौ मंदिरातील दागिने सहज कॅरी करू शकतो.

२. अनारकली सूटसोबत चांदबली छान दिसते तर बनारसी साडीबरोबर (Saree) ते तितकेच चांगले दिसते. चांदबली खूप हलकी असून आपल्या लुकला हेवी टच देते. जर आपण बनारसी साडीसोबत चांदबली कानातले घालत असू तर त्यासोबत नेकपीस घालणे टाळायला हवे. हवे असल्यास आपण या लुकमध्ये बांगड्याचा पेअर करू शकतो.

३. बनारसी साडीत हेवी लूक कॅरी करायचा असेल तर नेकपीस लेअरिंगचा विचार करु शकतो. सोनेरी टोन्ड चोकरसह लांब हार घालू शकतो. तसेच, आपण कानातल्यांचा लूक थोडा हलका ठेवू शकतो. लग्नानंतर नवीन वधू हा लूक कॅरी करू शकते.

४. बनारसी साडीच्या रंगानुसार आपण चोकरची स्टाइल निवडू शकतो. बनारसी साडीसोबत गोल्ड टोन्ड चोकर नेहमीच छान दिसेल. त्याच्या मदतीने आपण मॅचिंग कानातले आणि बांगड्या घालून आपला लुक पूर्ण करू शकतो.

५. काही घरगुती समारंभात बनारसी साडी नेसत असाल तर त्यावर आपण झुमके घालू शकतो. पिवळ्या किंवा लाल रंगाची बनारसी साडी नेसत असाल, तर त्यासोबत सोनेरी टोन्ड इअररिंग्ज स्टाईल करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT