how to choose jewelery on clothes
how to choose jewelery on clothes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कपड्यांना शोभतील अशा दागिन्यांची निवड कशी कराल

कपड्यांनुसार दागिन्यांची खरेदी करण्यासाठी काही टिप्स

मुंबई : आपल्या बऱ्याचदा लग्नाला, पार्टीला (Party) किंवा समारंभाला जायचे असते परंतु, घर आणि काम यामुळे आपण या गोष्टी सतत टाळत असतो. पण हेच जर आपल्या जवळच्या व्यक्तीचे लग्न किंवा इतर समारंभ असेल तर आपल्याला जाणे गरजेचे असते.

हे देखील पहा-

लग्न समारंभात आपल्याला आवडत्या रंगाचे कपडे मिळतात तर त्यावर साजेशी असे दागिने मिळत नाही त्यामुळे आपण बऱ्याचदा अडचणीत सापडतो. त्यासाठी आपण कपड्यांच्या प्रकारानुसार दागिन्यांची निवडही करायला हवी. कारण दागिने कपड्यांना शोभले नाहीत, तर आपल्यावर त्याचा प्रभाव पडणार नाही. विशेषत: वधूच्या दागिन्यांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दागिन्यांची (Jewelery) निवड कशी करावी हे जाणून घेऊया.

१. आपण साधे कपडे परिधान करत असू तर त्यावर मोत्याचे कानातले किंवा सोन्याचे लोंबते इयरिंग्ज घातल्यास आपला लूक उठून दिसेल

how to choose jewelery on clothes
कपड्यांच्या स्टाइलनुसार या स्टायलिश हँडबॅग्ज खरेदी करुन पहा

२. आपण कपड्यांना साजेसे रत्न घातल्यास आपल्या लूकमधे बदल दिसेल. कोणत्याही रंगाचे रत्न सोने किंवा हिऱ्याच्या पेंडटमध्ये अथवा इयरिंग्जमध्ये जोडले, तर तो दागिना सुंदर तर दिसेलच शिवाय तो अंत्यत वेगळाही वाटेल.

३. पारंपारिक पोशाखावर झुमके छान दिसतात. मात्र इंडो-वेस्टर्न लूकमध्ये झुमके शोभून दिसतात. या झुमक्यांमध्ये रंगीत खडे किंवा हिरे, सोने किंवा चांदीचा मिलाफ छान दिसतो. कटवर्क केलेले सोन्याचे झुमके सिल्क किंवा प्रिंटेड कुर्तीवर आणि पँटवर चांगले दिसतात.

४. एखाद्या छोट्या समारंभात कमी दागिने आणि मोठ्या कार्यक्रमात थोडे भारी दागिने घालायचे. मात्र मोठ्या समारंभात जर आपण भारी कपडे घातले असतील, तर त्यावर लाइटवेट दागिने वापरावेत. आँफिसमध्ये कामासाठी जाताना साधे आणि नाजूक दागिने वापरावे.

५. कपड्यांच्या रंगाला शोभेल अशा दागिन्यांची निवड करावी. आपल्या कपड्यांवर सोनेरी किंवा चंदेरी रंग असतील तर त्याच रंगाचे दागिने वापरा. आपल्याकडे व्हाइट गोल्डचे दागिने असतील तर पिवळ्या सोनेरी रंगाच्या गोटा किंवा एब्रॉयडरी केलेल्या कपड्यांवर ते घाला.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com