जगभरात हृदयरोगाचे वाढते प्रमाण आरोग्यासाठी गंभीर चिंता बनले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि हृदयाशी संबंधित घातक आजारांचा धोका वाढतो.
शरीरासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. हा एक प्रकारचा चरबीयुक्त पदार्थ (लिपिड) असून तो शरीरातील पेशींमध्ये आढळतो. हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डीच्या निर्मितीसोबतच अन्न पचवण्यास तो मदत करतो. मात्र, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे योग्य आहार आणि जीवनशैली महत्त्वाची ठरते.
अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. अशा सवयी असलेल्या लोकांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक आढळते, ज्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
जंक फूड, तळलेले पदार्थ यांसारखे संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स जास्त असलेले पदार्थ यांसारखे असंतुलित आहार कोलेस्टेरॉल वाढवू शकतो.
- नियमित व्यायामाच्या अभावामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते, त्यामुळे शारिरीक सक्रिय राहणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
- लठ्ठपणा, धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी जीवनशैली सुधारणे आणि पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे,८०/२० नियम पाळल्यास आरोग्यदायी खाण्याने कोलेस्ट्रॉल प्रभावीपणे नियंत्रित करता येऊ शकते.
- ८०/२० नियमानुसार, आहारात ८०% पौष्टिक पदार्थ असावेत. फायबरयुक्त, कमी चरबीयुक्त आणि कमी साखर असलेल्या पदार्थांचे सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
- २०% आहार लवचिक ठेवता येतो, त्यामुळे संतुलित प्रमाणात तुमच्या आवडीचे अन्न खाऊ शकता, मात्र आरोग्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ८०% सक्रिय राहा, नियमित व्यायाम करा, चालण्याची सवय लावा आणि २०% शरीराला आवश्यक विश्रांती द्या.
कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय खावे हे जाणून घ्या
- आहारात ऑलिव्ह तेल, शेंगदाण्याचे तेल, एवोकॅडो, नट्स आणि अळशी-चिया बियाणे समाविष्ट करून कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा.
- आहारात ओटमील, संपूर्ण धान्य, सफरचंद, नाशपाती, डाळी आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखी फायबरयुक्त अन्ने समाविष्ट करा.
- बिस्किटे, चिप्स आणि फास्ट फूडचे जास्त सेवन टाळा, यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका कमी होईल.
- दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. चालणे, धावणे आणि सायकल चालवण्याची सवय आरोग्यसाठी महत्त्वाची आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल वाढणे केवळ हृदयासाठीच नाही, तर शरीराच्या इतर भागांसाठीही धोकादायक ठरू शकते. उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका तरुणांनाही असू शकतो. म्हणून, ३० वर्षांवरील व्यक्तींनी नियमितपणे कोलेस्ट्रॉल तपासणी करून घेतली पाहिजे, यामुळे आरोग्य धोके कमी होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.