Dhanshri Shintre
शाळेतून परतलेल्या मुलांसाठी संध्याकाळी काय खास बनवावे, हा प्रश्न अनेक गृहिणींना नेहमी सतावणारा असतो.
दररोज सारखेच पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात, अशा वेळी त्यांच्यासाठी कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा कटलेट एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
उकडलेले बटाटे, किसलेला कोबी, मसाले, तांदळाचे पीठ, ब्रेड क्रम्प्स आणि कोथिंबिरीसह चविष्ट बटाटा कटलेटसाठी आवश्यक साहित्य तयार ठेवा.
प्रथम भांड्यात किसलेला कोबी घ्या, त्यात उकडलेले बटाटे स्मॅश करून मिश्रण सुरेख मऊ होईपर्यंत एकत्र करा.
मिश्रणात लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, तांदळाचे पीठ, कोथिंबीर आणि मीठ घालून छान मळून गोळा तयार करा.
तयार मिश्रणाचे छोटे गोलसर कटलेटच्या आकाराचे गोळे बनवा आणि तळण्यासाठी सुसज्ज ठेवा.
कटलेट मैद्याच्या मिश्रणात बुडवून ब्रेड क्रम्प्समध्ये घोळवा आणि नंतर गरम तेलात डिप फ्राय करून कुरकुरीत तळा.
गरमागरम बटाटा कटलेट स्वादिष्ट सॉसबरोबर सर्व्ह करा आणि त्याच्या अप्रतिम चवीचा आनंद घ्या.