Dhanshri Shintre
आपल्या घरी नाश्त्यासाठी रोज काहीतरी नवीन हवे असते? मग ट्राय करा पौष्टिक आणि स्वादिष्ट मक्याच्या दाण्यांचा उपमा.
पण नाश्त्यासाठी दर दुसऱ्या दिवशी तेच कांदेपोहे आणि उपमा बनवले जातात, त्यामुळे काहीतरी वेगळे हवे ना?
म्हणून आज आपण स्वादिष्ट आणि पौष्टिक मक्याच्या दाण्यांचा उपमा कसा बनवायचा ते शिकूया. चला, रेसिपी जाणून घेऊ
मक्याचे कणीस, कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, डाळिंब, कोथिंबीर आणि मसाले वापरून स्वादिष्ट आणि पौष्टिक कॉर्न उपमा तयार करा.
सर्वप्रथम मक्याचे कणीस किसणीने किसून घ्या, ज्यामुळे उपमासाठी मऊ आणि सहज शिजणारा मका तयार होईल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे आणि हिरवी मिरची टाकून छान फोडणी द्या.
यानंतर फोडणीमध्ये कढीपत्ता आणि कांदा घाला. मग कोथिंबीर टाका, ज्यामुळे उपमाला स्वादिष्ट चव आणि सुगंध मिळेल.
फोडणीत शेंगदाणे घालून परता, मग त्यात किसलेला मका टाकून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
पात्रावर झाकण ठेवून मका चांगला वाफवून घ्या. मग त्यात लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.