Dhanshri Shintre
महाराष्ट्रीयन घरांमध्ये नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा आवडतेच पदार्थ असून, हे दोन्ही पदार्थ रोजच्या आहाराचा भाग आहेत.
रोजच्या नाश्त्यात सारखे पोहे आणि उपमा खाल्ल्याने एकसुरीपणा येतो, त्यामुळे काहीतरी नवीन चव ट्राय करावीशी वाटते.
रवा किंवा शेवयापासून उपमा केला जातो, त्याच पद्धतीने चविष्ट आणि वेगळ्या स्वादाचा दही उपमा सहज तयार होतो.
१ कप रवा, १ कप दही, तूप, जिरे, शेंगदाणे, डाळिंब, कोथिंबीर आणि आवडीनुसार भाज्यांसह स्वादिष्ट दही उपमा तयार करा.
एका भांड्यात दही घ्या, त्यात मिरची, मीठ, कोथिंबीर मिसळून व्यवस्थित हलवा आणि बाजूला ठेवून द्या.
एका भांड्यात तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची आणि पांढरी डाळ टाकून चांगले परतून घ्या.
कांदा, वाटाणे, गाजर घालून परतून घ्या, नंतर त्यात रवा टाकून मिश्रण छान हलवून परतून घ्या.
रव्यामध्ये तयार दह्याचे पाणी घाला आणि सतत हलवत राहा, गाठी पडू नयेत याची विशेष काळजी घ्या.
उपमा प्लेटमध्ये सर्व्ह करा, वरून कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि तळलेले शेंगदाणे टाकून सजवा व आनंद घ्या.