Dhanshri Shintre
सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने राहता येते, थकवा जाणवत नाही. त्यामुळे नाश्ता फायदेशीर आहे.
सकाळच्या नाश्त्यात केवळ कडधान्य न खाता, तुम्ही स्वादिष्ट आणि पौष्टिक ब्रेड रोल बनवून आरोग्यदायी पर्याय निवडू शकता.
चला जाणून घेऊया कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल बनवण्यासाठी आवश्यक साहित्य आणि त्याची सोपी व चविष्ट रेसिपी.
ब्रेड स्लाइस, मोड आलेली कडधान्ये, लसूण-आले-मिरची पेस्ट, मीठ, तेल, कोथिंबीर, बटर आणि उकडलेल्या बटाट्यांची पेस्ट लागते.
ब्रेड रोलसाठी सर्वप्रथम मोड आलेली मिक्स कडधान्ये कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावीत, त्यामुळे रोल अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होतील.
शिजलेल्या कडधान्यांत आले-मिरची-लसूण-बटाटा पेस्ट मिसळून मिश्रण तयार करा आणि त्याचे छोटे-छोटे गोळे बनवा.
ब्रेडच्या कडा कापून टाका, नंतर ब्रेड पोळपाटावर ठेवा आणि हलक्या हाताने लाटून सपाट करा.
लाटलेल्या ब्रेडवर एक चमचा कडधान्यांचे गोळे ठेवा आणि करंजी किंवा पोळीच्या रोलसारखे नीट गुंडाळून घ्या.
ब्रेडच्या कडांना हलकेसे पाणी लावून बंद करा आणि तयार रोल तव्यावर बटर घालून खरपूस भाजून घ्या.
तयार झालेले कडधान्यांचे गरमागरम ब्रेड रोल हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉससोबत खाऊ शकता.