Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : मुली कधी सांगत नाहीत, मात्र मुलांच्या स्वभावातील 'या' गोष्टी त्यांना फार आवडतात

Girls Like These Things : आपल्या प्रेयसीला आवडेल तसंच आपण रहावं यासाठी अनेक मुलं प्रयत्न करतात. त्यामुळे आज मुलींना मुलांमधील कोणत्या गोष्टी आवडतात ते जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

मुलींना समजून घेणं फार कठीण असतं, असं अनेक मुलं म्हणतात. मुली कायम कमी बोलतात. त्यांना एखादी गोष्टी आवडली तरी खुलून व्यक्त होत नाहीत. तसेच काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यावर देखील त्या व्यक्त होत नाहीत. त्यामुळे मुलींच्या मनात सध्या काय चाललं आहे, हे ओळखणं प्रत्येक मुलाला कठीण जातं.

आता तुम्हालाही गर्लफ्रेंड, मैत्रीण किंवा पत्नी असेल तर तिच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी तुमचीही फार धडपड होत असेल. मुलीच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समून घेणं फार कठीण असतं. मात्र आपल्या प्रेयसीला आवडेल तसंच आपण रहावं यासाठी अनेक मुलं प्रयत्न करतात. त्यामुळे आज मुलींना मुलांमधील कोणत्या गोष्टी आवडतात ते जाणून घेऊ.

फोटो काढणे

मुली सारख्या या गोष्टी सांगत नाहीत मात्र त्यांना सतत फोटो काढायला आवडतं. मुलींना आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अनेक आठवणी साठवून ठेवाव्यात असं वाटत असतं. त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला भेटल्यावर तुम्ही देखील तिचे आणि तिच्यासोबत तुमचे कपल फोटोशूट करत जा.

भरपूरवेळ गप्पा करणे

प्रत्येक व्यक्तीला खुलून आणि मनमोकळेपणाने बोलावं वाटतं. जेव्हा मुली मुलांसोबत जास्तवेळा आणि खुलून बोलतात तेव्हा मुलींच्या मनातील सर्व भार कमी होत जातो. मुली त्यांची स्वप्ने आणि पुढे काय करणार आहे याबाबत प्लानींग करतात त्यावर जेव्हा मुलं त्यांना साथ देतात आणि त्यांच्याप्रमाणे बोलतात तेव्हा ही गोष्ट मुलींना फार आवडते. तसेच मुली मुलांवर जास्त विश्वास ठेवू लगतात.

केसांवर हात फिरवणे

प्रत्येक मुलीला एक सेन्स असतो ज्यामध्ये मुलाचा स्पर्श कोणत्या हेतूने आहे ते ओळखता येतं. मुलं जेव्हा मुलांच्या केसांना हात लावतात. चेहऱ्यावर आलेले केस मागे करतात. त्यांच्या पाठीवर हात फिरवतात, तसेच कपाळा किस करतात तेव्हा मुलींना या गोष्टी फार आवडतात. मुली हे कधी सांगत नाहीत, मात्र असं केल्याने मुली सेफ फिल करतात.

किस करणे

मुलींना किस करताना कायम आधी त्यांच्या कपाळा किस करा. कपाळा किस केल्याने आपल्या पतीला, आपल्या बॉयफ्रेंडला आपली काळजी असल्याच्या भावना मुलींच्या मनात येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT