Relationships Tips : सासू-सासऱ्यांशी सतत भांडणं होतायत? मग 'या' टिप्सने नात्यात येईल गोडवा

Healthy Relation With in laws : सासू-सासरे यांच्या मनधरणी करणे प्रत्येक मुलीला फार कठीण जाते. लग्नानंतर तुम्हाला देखील अशा अडचणींचा सामना करावा लागत असेल तर काय करावे याची माहिती जाणून घेऊ.
Healthy Relation With in laws
Relationships Tips Saam TV
Published On

लग्न झाल्यावर एका मुलीच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींमध्ये बदल होतो. लग्नानंतर पतीसह त्याचे आई-वडिल, भाऊ - बहिण म्हणजेच सासू -सासरे, नणंद आणि दिर यांना देखील आपलसं करावं लागतं. मात्र बाहेरून घरी आलेली मुलगी लगेच या सर्वांमध्ये ऍडजेस्ट होत नाही. विचार आणि सवयी वेगवेगळ्या असल्याने काहीवेळा सासरच्या मंडळींशी वाद होतात.

Healthy Relation With in laws
Husband Wife Relation: लग्नानंतर पती-पत्नीने 'या' गोष्टी आर्वजून कराव्यात!

वाद झाल्यावर पतीला समजवता येतं आणि अनेकवेळा पती-पत्नीमधील वाद मिटतात देखील. मात्र सासू-सासरे यांची मनधरणी करणे प्रत्येक मुलीला फार कठीण जाते. त्यामुळे आज लग्नानंतर तुम्हाला देखील अशा अडचणींचा सामना करावा लागत असेल तर काय करावे याची माहिती जाणून घेऊ.

मर्यादा ठरवून घ्या

प्रत्येक व्यक्तीने आपल्या मर्यादा ठरवल्या पाहिजेत. मर्यादा ठरवल्याने आपल्याला सासरच्या व्यक्तींशी संवाद साधताना मदत होते. प्रत्येक व्यक्तीला काही विषयांवर स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायचे असतात. मात्र तुमच्या सासरच्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घ्या. त्यानुसार कोणत्या विषयांवर त्यांचे निर्णय घेणे गरजेचे आहे ते देखील जाणून घ्या. असे केल्याने तुम्हाला सासू-सासऱ्यांसोबत राहताना अडचणी येणार नाहीत.

भांडणांमध्ये पतीला घेऊ नका

सासू-सासऱ्यांशी भांडण होत असेल तर सतत याची तक्रार आपल्या पतीकडे करू नका. तु्म्ही स्वत:तुमच्या अडचणी, तुमचे विचार आणि तुमचे विचार सासू-सासऱ्यांना समजावून सांगा. स्वत:चे मुद्दे सांगताना आवाज कमी ठेवा. जास्त मोठ्याने आणि ओरडून न बोलता शांततेत तुमचं मत त्यांच्यासमोर मांडा. असे केल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण होऊ शकतो.

ऐकून घेण्याची क्षमता वाढवा

अनेकदा घरांमध्ये सासरे चांगले आणि सासूबाई वाईट स्वभावाच्या असतात. अशावेळी तेथे स्वत:चं मानसीक स्वस्थ ठिक कसं राहील याबद्दल विचार करा. सासूबाई भांडण करणाऱ्या स्वभावाच्या असतील तर त्यांनी एखाद्या मुद्द्यावरून ओरडल्यास शांत बसा आणि त्या काय बोलतात ते फक्त ऐकून घ्या. त्यांनी बोललेले कोणतेही शब्द मनाला लावून घेऊ नका. चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीला आपल्या चूकांची शिक्षा कधी ना कधी नक्की मिळते असे स्वत:च्या मनाला सतत सांगत राहा आणि शांत राहा.

Healthy Relation With in laws
Kiran- Asmita Relation Rumors: 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा व्हॅलेंटाईन डे दणक्यात, अस्मिता देशमुखसोबत करणार खास सेलिब्रेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com