stress management google
लाईफस्टाईल

Stress Relief Techniques: ताणतणावाला करा Bye Bye! रोज करा ही 5 कामं, टेन्शन फ्री जगाल

Mind Peace: दैनंदिन आयुष्यातील छोट्या सवयी स्वीकारल्यास मानसिक ताण, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता कमी होऊन मन शांत, हलकं आणि आनंदी राहू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात.

Sakshi Sunil Jadhav

नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. आजकालच्या धावपळीत अनेकांना स्वत: साठी वेळ मिळत नाही. यात पुरुष आणि स्त्रिया अशा दोघांचाही समावेश होतो. दिवसभर काम, कुटुंबाचं टेन्शन, मिळणाऱ्या वेळात सोशल मिडीयाचा अती वापर, अपुरी झोप आणि शेवटी एकटेपण असं काहींच आयुष्य झालेलं असतं.

या सगळ्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. मात्र तज्ज्ञांच्या मते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक वेळी औषधांची किंवा मोठे बदल करण्याची गरज नसते. दैनंदिन जीवनात काही छोट्या पण प्रभावी सवयी अंगीकारल्यास मन शांत, हलकं आणि आनंदी राहतं. पुढील लेखात आपण याच बदलांबदल जाणून घेणार आहोत.

१. घरातली अस्वच्छता.

घरात असलेली अव्यवस्था फक्त दिसायलाच त्रासदायक नसते, तर ती मनालाही अस्वस्थ करते. आजूबाजूला पसारा असेल तर नकळत तुमची चिडचिड वाढते. दररोज फक्त १० ते १५ मिनिटं काढून कपाट, टेबल किंवा घरातील एखादा कोपरा आवरायला सुरुवात केल्यावर घरासोबतच मनही स्वच्छ आणि हलकं वाटायला लागतं.

२. नियमित चालणे.

रोज चालण्याची सवय लावणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. सकाळी किंवा संध्याकाळी २० ते ३० मिनिटं चालण्याने ताण कमी होतो आणि मूड सुधारतो. जमल्यास असल्यास मोकळ्या जागेत किंवा हिरवळीत चालणं जास्त परिणामकारक ठरतं.

३. योग्य आहार.

आपण जे खातो त्याचा थेट परिणाम मेंदूवर होत असतो. जास्त तळलेले आणि जंक फूड तात्पुरती आनंदाची भावना देतं, नंतर थकवा आणि चिडचिड वाढवतं. घरचं पौष्टिक अन्न, फळं, भाज्या, डाळी, दही आणि सुका मेवा तुमचं मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतं.

४. गाणी ऐकणे.

गाणी ऐकण्याचा मनावर खोल परिणाम होतो. मन उदास किंवा अस्वस्थ असताना आवडती गाणी ऐकली की लगेचच हलकं वाटतं. प्रवास करताना किंवा कामाच्या वेळी हलकं संगीत ऐकल्याने तुमचा मानसिक ताण कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात.

५. तुमचं वाचन.

सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मेंदू थकतो. अशा वेळी पुस्तकं, कथा किंवा हलकं वाचन केल्यास मनाला विश्रांती मिळते. वाचनामुळे नकारात्मक विचारांपासून लक्ष हटतं आणि एकाग्रता वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंकडून भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

Oscars 2026: ऑस्कर 2026 च्या नॉमिनेशनमध्ये 'सिनर्स'चा दबदबा; १६ कॅटेगरीमध्ये निवड, रचला नवा इतिहास

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत मनसेने महापौरपद गमावलं, भाजपसोबत गेले असते तर मिळाली असती संधी

IND vs NZ: दुसऱ्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यरची एंट्री? या खेळाडूचं स्थान धोक्यात, पाहा संभाव्य प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT