When Feel Lonely Saam Tv
लाईफस्टाईल

When Feel Lonely : एकटेपणा जाणवेल तेव्हा हे काम करा, तणाव लगेच होईल दूर

How To Stress Free : कधीकधी उदासीनता आणि एकटेपणा जाणवणे सामान्य आहे, परंतु जेव्हा ते एक दिवस किंवा आठवडाभर चालू राहिले की मानसिक त्रास होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

When Feel Lonely :

कधीकधी उदासीनता आणि एकटेपणा जाणवणे सामान्य आहे, परंतु जेव्हा ते एक दिवस किंवा आठवडाभर चालू राहिले की मानसिक त्रास होतो. मग आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या स्थितीवर मात करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती नक्कीच असतात जिच्याशी संवाद केल्यामुळे विशेष दिलासा मिळतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा त्यांच्याशी बोला. तुमच्या समस्या त्यांच्याशी शेअर (Share) करा, तुमच्या मनाला शांती मिळेल.

- आपल्या सर्वांकडे आनंददायी आठवणी आणि अनुभवांचा असा खजिना आहे, ज्यामध्ये डुबकी मारल्याने मन आनंदी भावनांनी भरते. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःखी, निराश किंवा एकटेपणा वाटत असेल तेव्हा याकडे लक्ष द्या.

- तुमचे छंद (Hobby) जोपासा. चित्रकला-फोटोग्राफी करा, संगीत ऐका, नवीन भाषा शिका, तुमचे आवडते खेळ खेळा. YouTube वर तुमची आवडणारे व्हिडिओ पाहा. तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल.

- पेहराव केल्याने मन आनंदी भावनांनी भरते, म्हणून जेव्हा जेव्हा एकटेपणा तुम्हाला खूप त्रास देतो तेव्हा स्वतःचे लाड करा. नवीन स्टाईलने आपले केस विंचरा. तुमचे आवडते कपडे घाला.

- पुस्तके हे चांगले मित्र आहेत. हे वाचण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला एकटेपणाशी लढण्याची ताकद मिळेल.

- हसल्याने तणाव (Stress) दूर होतो आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून, स्वतः हसत राहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना मजेदार किस्से आणि विनोद सांगून हसवा.

- पाळीव प्राण्यांशी मैत्री करा. ते तुम्हाला कधीही एकटेपणा जाणवू देणार नाहीत.

- मुलांसोबत वेळ घालवा. त्यांचे मजेदार बोलणे आणि हसरे चेहरे दुःख दूर करतील.

- प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, त्यामुळे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. असे केल्याने मन अधिक अस्वस्थ होऊ शकते.

- कधीतरी स्वतःशी बोला. तुमची सामर्थ्ये आणि यशाचा विचार करा. हे सकारात्मकता प्रदान करते. तणावही कमी होतो.

- काही काळानंतर आपले लक्ष्य बदलत राहा. त्यांना मिळवण्याचाही प्रयत्न करा. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, अनेक वेळा आपल्याला इतर कशाचाही विचार करायला वेळ मिळत नाही. यामुळे एकटेपणाही दूर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT