Mental Health Saam Tv
लाईफस्टाईल

Mental Health : या चुकीच्या सवयींमुळे वाढतो मानसिक ताण, वेळीच घ्या काळजी

Mental Stress : वाढता कामाचा व्याप, बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वाढता स्क्रीन टाइम आणि अपुरी झोप यामुळे आपली चिडचिड होते. त्यामुळे आपल्याला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

Bad Habits Dangerous For Mental Health :

वाढता कामाचा व्याप, बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वाढता स्क्रीन टाइम आणि अपुरी झोप यामुळे आपली चिडचिड होते. त्यामुळे आपल्याला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

अतिरिक्त तणावामुळे (Stress) आपल्याला आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शारीरिक आरोग्य जितके चांगले असायला हवे तितकेच मानसिक आरोग्यही (Health) महत्त्वाचे आहे.

मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे आपण डिप्रेशनचा (Depression) शिकार बनतो आहे. आपल्या काही वाईट सवयींमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे सतत मनात नकारात्मकतेची भावना येते. जाणून घेऊया आपल्या चुकीच्या सवयींबद्दल

1. जास्त ताण घेणे

व्यस्त जीवनशैली, कामाच्या पद्धती आणि वैयक्तिक कारणांमुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्यास सुरुवात करतो. तणावामुळे आपण हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागतो. ज्यामुळे मानसिक आरोग्याला नुकसान होते.

2. स्वत: साठी वेळ न देणे

धावपळीच्या जीवनशैलीत आपण स्वत:ला वेळ देत नाही. अशावेळी कामातून स्वत:साठी वेळ काढा आणि आराम करा. स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टी करा, ध्यान करा, ज्यामुळे तुमचे मन शांत होईल.

3. सकस आहार न घेणे

शारीरिक आरोग्याबरोबर तुम्ही जे काही खाता त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. हल्ली बाहेरचे आणि जंक फूडचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. यामुळे तुमचे वजन वाढतेच पण मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आणि फळे यांचा समावेश करा.

4. अपुरी झोप

अपूर्ण झोपेमुळे मानसिक आरोग्य बिघडते. रात्री अधिकवेळ स्क्रीन टाइम पाहिल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी पूर्ण झोप घ्या. असे न केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

5. व्यायाम न करणे

व्यायाम जितका शरीरासाठी चांगला आहे तितकाच मानसिक आरोग्यासाठी चांगला आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमचे शरीर तुमचा मूड चांगला ठेवते. ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT