New Year Health Goals  ai generated
लाईफस्टाईल

New Year Health Goals : नव्या वर्षात फीट ॲंड फाईन राहायचं असेल तर आयुर्वेदातल्या 'या' सवयी आत्ताच फॉलो करा

Ayurveda for Fitness : प्रत्येकाला नवीन वर्षात खूप काही मिळवायचं असतं. खूप मेहनत करायची करायची असते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मेहनत घ्यावी लागते.

Saam Tv

प्रत्येकाला नवीन वर्षात खूप काही मिळवायचं असतं. खूप मेहनत करायची करायची असते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर मेहनत घ्यावी लागते. आता एखाद्या व्यक्तीला कामात, व्यवसायात, क्रिडा क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यात सध्याची जिवनशैली खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप बदलत चालली आहे.

जिवनशैली म्हणजे तुम्ही दिवसभर करणारी कामं. त्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. त्यातल्या महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. मग आजारपणात तुमचे दिवस निघून जातात आणि ठरलेल्या गोष्टी, कामं वेळेवर पुर्ण होत नाहीत. त्यासाठी तुम्ही आयुर्वेदानुसार काही गोष्टींचे पालन करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

वजन वाढत असेल तर?

तुमचं वजन वाढत असेल तर झोपेला अधिक महत्व दिलं पाहिजे. किमान ८ तास झोपलं पाहिजे. तसेच अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. ही सवय तुम्ही नव्या वर्षापासून सुरू करू शकता.

शारिरीक क्रियाकलाप

नियमित शरिरीक क्रियाकलाप करणं महत्वाचं आहे. त्याने तुमच्या शरीरातली काम करण्याची ऊर्जा वाढते. रक्तदाब नियंत्रित होतो. तसेच पुर्ण मेंदू योग्य रित्या कामं करतो आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागते.

यकृताचे कार्य

उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा आणि उच्च कोलेस्ट्ऱॉल या कारणांमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. असे होऊ नये म्हणून तुमच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रिण ठेवा, वजन कमी करा, कोलेस्ट्ऱॉल कमी करा. या पद्धतीची जिवनशैली तुम्हाला नक्कीच उत्तम आरोग्य मिळवून देऊ शकते. ही सवय तुम्ही नव्या वर्षापासून सुरू करू शकता.

ह्रदयाचे उत्तम आरोग्य

तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही एका काढ्याचे सेवन रोज करू शकता. जे लोक धावपळीचे जिवन जगतात त्यांच्यासाठी एक उत्तम आणि सलगळ्यात रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्ही एक चमचा अर्जूनाच्या झाडाचे साल, दोन ग्रॅम दालचीनी आणि ५ ते सहा तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याला गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता. त्याने शारिरीक धकवा सुद्धा दूर होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By : Sakshi Jadhav

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT