Sprouts Recipes  google
लाईफस्टाईल

Sprouts Recipes : झटपट बनवा 'ही' कडधान्य टिक्की अन् वाढवा शरीरातले व्हिटॅमिन

Sprouts Tikki Recipe : कडधान्य आपल्या चांगल्या आयुष्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं. कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात त्याने आपली पचनक्रीया उत्तमरित्या काम करते.

Saam Tv

कडधान्य आपल्या चांगल्या आयुष्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं. कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात त्याने आपली पचनक्रीया उत्तमरित्या काम करते. बद्धकोठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून लांब राहण्यासाठी तुम्ही कडधान्यांचा वापर तुमच्या रोजच्या आहारात केला पाहिजे. त्याने भूक नियंत्रणात राहते आणि आपण आपसूक बाहेरचे खाणे टाळतो. चला तर कडधान्यांपासून तयार होणारी टेस्टी डीशची रेसिपी जाणून घेऊ.

स्प्राऊट्स पनीर टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ कप स्प्राऊट्स

अर्धा कप किसलेले चीज

५-६ हिरव्या मिरच्या

१ इंच आलं

२ लसून पाकळ्या

१ लहान आकाराचा कांदा

पाव चमचा हळद

पाव चमचा लाल तिखट

पाव चमचा जिरे पावडर

पाव चमचा चाट मसाला

पाव चमचा गरम मसाला

मीठ

पॅटीस बनवण्याची कृती

सर्वप्रथम उकडलेल्या स्प्राऊट्समध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कांदा बारिक चिरून मिक्स करून घ्या. आता एका भांड्यात चीज घ्या आणि त्यात सर्व मसाले, पेस्ट, स्प्राऊट्स मिक्स करून घ्या. मिश्रण ओले झाले की त्यात भाजलेले बेसन अॅड करा. आता या मिश्रणाचा थोडासा भाग घ्या आणि टिक्की बनवा. सर्व टिक्की अशाच प्रकारे बनवा.

आता पॅन गरम करायला ठेवा. त्यावर थोडे तेल लावा आणि प्रत्येक टिक्की तळून घ्या. चविष्ठ-हेल्दी स्प्राऊट्सची पनीर टिक्की तयार आहे. तुम्ही ही टिक्की किंवा पॅटीस तुमच्या मुलांना रोजच्या आहारात देऊ शकता. त्याने मुलांची तब्बेत वाढण्यास मदत होईल. तसेच तुम्ही हे पॅटीस चटणी, दही, पुदीना अशा विविध चटण्यांसोबत खाऊ शकता.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT