Super Bikes Under 2 Lakh : Yamaha, Royal Enfield, आणि Maruti Suzuki यासह अनेक मोठ्या बाईक मोटार कंपन्यांनी त्यांच्या उत्कृष्ट बाईक बाजारात सादर केल्या आहेत. ज्या किमतीत थोड्या महाग आहेत, पण यांचे फीचर्स जबरदस्त आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा काही उत्तम बाईक्सबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि यात आधुनिक फीचर्स मिळतात.
Yamaha MT 15 V2 ही एक दमदार बाईक आहे, जी दिसायला स्टायलिश आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत 1,68,400 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही 155 सीसी सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. यात 18.4bhp पॉवर आणि 14.1Nm टॉर्क आहे. याला 180 मिमीच्या सीटची उंची मिळते. (Latest Marathi News)
Royal Enfield Hunter 350 कमाल पॉवर 20.4 PS आणि 27 NM पीक टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलवर 38 किमी मायलेज देते. Enfield Hunter 350 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याचे वजन 180 किलो आहे. (Latest Auto News in Marathi)
Yamaha R15 V4 ची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे. ग्राहक ही बाईक 20,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकतात. 5,625 च्या मासिक EMI वर कर्जावर देखील खरेदी करू शकता.
या बाईकमध्ये 155 सीसी सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन आहे, जे 14.2 Nm पीक टॉर्कसह 18.4 PS कमाल पॉवर जनरेट करते. Yamaha R15 V4 55.20 kmpl चा मायलेज देते.
Suzuki Gixxer 250 ची किंमत 1.95 लाख रुपये आहे. या बाईकमध्ये 250 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे. बाईक 9300rpm वर 26PS पॉवर आणि 7300rpm वर 22Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय 13 लीटरची इंधन टाकी आहे. ही बाईक 40 किमी प्रति लीटर मायलेज देते.
KTM 200 Duke ची किंमत 1.91 लाख रुपये आहे. KTM 200 सीरीजने गेल्या महिन्यात 4,002 मोटारसायकली विकल्या. या बाईकमध्ये 25.83 PS च्या पॉवरसह 19.5 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. 35 किमी प्रति लीटर मायलेज देते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.