Diabetes Saam TV
लाईफस्टाईल

Diabetes : तज्ज्ञांनी सांगितले, मधुमेह असणाऱ्यांना मिळेल आता आराम; करा 'या' रोपाचे सेवन !

दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

कोमल दामुद्रे

Diabetes : निरोगी जीवनशैलीत कुणाला आवडत नाही. हल्ली प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. हल्ली बरेच लोक मधुमेहांने ग्रस्त आहेत. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच.

काहीवेळेस हा आजार आनुवंशिक असतो तर काही वेळेस मानसिक ताण किंवा खाण्यापिण्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे होतो. मधुमेह (Diabetes) आणि हृदयविकाराचा झटका हे दोन्ही गुंतागुंतीचे आजार (Disease) आहेत आणि त्यांचा एकमेकांमध्ये खोल संबंध आहे. मधुमेह असणाऱ्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो.

अशा परिस्थितीत दोन्ही गोष्टींवर हल्ला करणारे पदार्थ आपण खाणे टाळले पाहिजे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत स्पिरुलिनाचे सेवन केले पाहिजे, ही पाण्यात आढळणारी एक वनस्पती आहे जी सहसा धबधबे आणि तलावांच्या जवळ असते. मधुमेह व हृदयाच्या आरोग्यासाठी हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो.

स्पिरुलीनामध्ये पोषक घटक आढळतात

स्पिरुलिनामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. प्रथिने वनस्पतीच्या ६० टक्के भाग बनवतात, आणि इतर अनेक आवश्यक अमीनो ऍसिड देखील आढळतात. याशिवाय स्पिरुलिना खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्व ए, लोह, कॅल्शियम, कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यामुळेच याला सुपरफूडच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ते आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते पाहूया.

स्पिरुलिना खाण्याचे फायदे

१. मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. स्पिरुलिनाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेही अनेक समस्यांपासून वाचतात. तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे त्यांनी या वनस्पतीचे सेवन जरूर करावे.

२. हृदययाचे आरोग्य रोखणे

स्पिरुलिना खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज सारखे हृदयविकार होऊ शकतात. स्पिरुलीनाचे सेवन सतत केल्यास रक्तप्रवाह चांगला सुरळीत राहतो.

३. वजन कमी करण्यास प्रभावी

ज्या लोकांचे वजन सतत वाढत आहे, त्यांनी स्पिरुलिनाचे सेवन जरूर करावे. त्यात बीटा कॅरोटीन, फॅटी ऍसिडस्, क्लोरोफिल आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात जे कंबर आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT