Recipe In Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Recipe: कडू कारल्याची झटपट बनवा आंबट गोड भाजी; रेसिपी पाहा

Bitter Guard Recipe: कारल्याची भाजी अनेकांना आवडत नाही. विशेषतः लहान मुले ही भाजी खात नाही. परंतु कारलं शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे या पद्धतीने रेसिपी ट्राय करा. लहान मुलांना नक्कीच आवडेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Spicy Karla Bhaji Recipe:

कारल्याच्या भाजीचं नाव घेतल्यावर अनेकांची नाक मुरडतात. लहान मुलांना कारल विशेषतः आवडत नाही. अनेकाना करालं म्हटल्यावर ते कडवटपणा आठवतो. परंतु कारलं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे कारल खायला हवे.

कारल्याची भाजी करताना नेहमी लहान मुलांचा विचार करुन करायला हवी. त्यासाठी त्यात थोडासा गुळ किंवा चिंच टाकावे. त्यामुळे भाजीला गोडसरपणा येतो. तसेच भाजी करताना नेहमी कारली चिरुन त्यातील बिया काढून घ्याव्या. तसेच कारले चिरल्यानंतर कापा मीठाच्या पाण्यात काहीवेळ ठेवा. जेणेकरुन त्यातील कडूपणा निघून जाईल. आज आम्ही तुम्ही कारल्याची अशी रेसिपी सांगणार आहोत. जी खायला कडू नसेल अन् बनवायलाही सोपी असेल. (Latest News)

साम्रगी

  • कारले

  • पाणी

  • मीठ

  • जिरे तेल

  • चिंच

  • लाल तिखट

  • हळद

कृती

  • सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात.

  • यानंतर कारल्याच्या मोठ्या फोडी होतील असे चिरुन घ्यावे.

  • एका भांड्यात पाणी ठेवून त्यात चिंच पाणी उकळून घ्यावे. त्या पाण्यात चिरलेले कारले टाकावे. पाच ते सात मिनिटे हे पाणी उकळून घ्यावे.

  • यानंतर कढईत एक चमचा तेल टाकून त्यात जिरे, हळद, लाल तिखट दोन मिनिटांसाठी छान परतून घ्या.

  • यानंतर या मिश्रणात उकळलेल्या पाण्यातील कारल्याच्या फोडी टाका. त्यानंतर ही भाजी छान एकजीव करुन घ्या.

तुम्ही ही भाजी चपाती, रोटी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 518 घरांची पडझड

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

SCROLL FOR NEXT