New Job in 2024: 100 पैकी 88 कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात, काय आहे कारण?

Linkedin Survey: नोकरी शोधणाऱ्यांच्या ट्रेंडबद्दल एक माहिती समोर आलीय. 100 पैकी 88 कर्मचारी नवीन नोकरीच्या शोधात आहेत, याचं कारण जाणून घेवू या.
Job
JobSaam Tv
Published On

How To Get New Job

बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनच्या एका नवीन संशोधनात नोकरी शोधणाऱ्यांच्या ट्रेंडबद्दल मनोरंजक माहिती समोर आली आहे. लिंक्डइनच्या मते, नोकरी शोधणारे लोकं आता त्यांच्या मिळकतीवर जास्त भर देत आहेत. भारतातील सुमारे 88 टक्के व्यावसायिक 2024 मध्ये नवीन नोकरी (New Job) शोधण्याचा विचार करत आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी अधिक आहे. (latest job update)

2023 मध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वाढली

लिंक्डइनच्या (Linkedin) अहवालानुसार 2023 मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नोकरी शोधण्याचं प्रमाण वाढलं आहे. यावर्षी नोकरी बदललेल्या 42 टक्के लोकं वर्क लाईफ बॅलन्सला प्राधान्य देत आहेत. तर, 37 टक्के जास्त पगाराला प्राधान्य देत आहेत. 79 टक्के लोकं चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. ते त्यांच्या सध्याच्या कामाऐवजी नवीन क्षेत्रात नोकरी (new job) शोधत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इच्छित नोकरी मिळण्यास मदत

आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत दुविधा कायम आहे. ज्या लोकांना सध्याची नोकरी बदलून नवी नोकरी करायची आहे, त्यांना इतर उमेदवारांकडूनही आव्हानांना सामोरे जावं लागेल. लिंक्डइनच्या मते, व्यावसायिकांना त्यांचं प्रोफाइल सुधारावं लागेल, त्यांचे कौशल्य मजबूत करावे लागेल. त्याचवेळी, त्यांना उद्योगात होत असलेले बदल समजून घेण्यासाठी सतर्क राहावं लागेल. त्यामुळे त्यांना इच्छित नोकरी (new job) मिळण्यास मदत होईल. पण हे सर्व करणं सोपं नाही, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता लोकांच्या तसेच मशीन्सच्या गर्दीत स्वतःला सिद्ध करणं मोठं आव्हान बनलंय.

नोकरदारांना कौशल्ये सुधारावे लागणार

नोकरी शोधण्यासाठी कौशल्ये सुधारावी लागतील. लिंक्डइनच्या (Linkedin) सर्वेक्षणात म्हटलंय की, 45 टक्के व्यावसायिकांना त्यांच्या कौशल्यांना इच्छित नोकरी कशी मिळवायची हे माहित नाही. या कमतरतेमुळे त्यांच्यासाठी नोकरी शोधण्याची प्रक्रिया कठीण होऊ शकते. लिंक्डइनच्या डेटावरून समोर आलेल्या माहितीनुसार, 2015 पासून नोकऱ्यांसाठी कौशल्यांमध्ये 30 टक्के बदल झाला आहे. त्याचवेळी 55 टक्के व्यावसायिकांनी नोकरी शोधणं निराशाजनक असल्याचं म्हटलंय.

Job
Job Recruitment Stopped: राज्यातील सरकारी नोकर भरती तात्काळ स्थगित करावी...;अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

बायोडेटा डिजिटल झाला

नोकरी शोधण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. लिंक्डइनच्या मते 72 टक्के लोकांनी नोकरी शोधण्याची वृत्ती बदलली आहे. ते व्हिडिओ आणि डिजिटल रेझ्युमे सारख्या नवीन पद्धती वापरत आहेत. 81 टक्के व्यावसायिक AI वापरण्यास उत्सुक आहेत. त्यामुळं नोकरी (new job) शोधणं सोपं होवू शकतं, असा त्यांचा विश्वास आहे. 79 टक्के लोकं लिंक्डइनवर अधिक सामग्री पोस्ट करत आहेत. 83 टक्के त्यांचे व्यावसायिक नेटवर्क वाढवण्यात अधिक सक्रिय होत आहेत. यासोबतच व्यावसायिक आता त्यांचा ब्रँड मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. नोकरी शोधण्यात मदत करणाऱ्या कनेक्शनचीही मदत घेत आहेत.

Job
Mumbai Job Scam: मुंबईत सर्वात मोठा 'जॉब स्कॅम', शेकडो तरूण आणि कोट्यवधींची फसवणूक, नेमका झोल काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com