Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

Mumbai Job Scam: मुंबईत सर्वात मोठा 'जॉब स्कॅम', शेकडो तरूण आणि कोट्यवधींची फसवणूक, नेमका झोल काय?

Mumbai Crime News: परदेशात नोकरी देण्याचा आमिष दाखवून शेकडो तरुणांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने परदाफाश केला आहे. या टोळीचं दक्षिण मुंबई खार, सांताक्रुज, गोरेगाव आणि मीरा रोड येथे सिल्वर ट्रॅव्हल्स आणि रॉयल ट्रॅव्हल्स नावाने प्लेसमेंट एजन्सी आहे.
Published on

>> सचिन गाड

Mumbai Job Scam:

परदेशात नोकरी देण्याचा आमिष दाखवून शेकडो तरुणांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने परदाफाश केला आहे. या टोळीचं दक्षिण मुंबई खार, सांताक्रुज, गोरेगाव आणि मीरा रोड येथे सिल्वर ट्रॅव्हल्स आणि रॉयल ट्रॅव्हल्स नावाने प्लेसमेंट एजन्सी आहे. येथून ते कुवेत, दुबई आणि सिंगापूर या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरीच आमिष दाखवून तरूणांना आपल्या जाळ्यात ओढत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी या तरुणांना ऑफर लेटर तसेच संबंधित देशांचा बनावट विजा देऊन त्यांचा विश्वास संपादन करायची. नंतर प्रत्येकाकडून तब्बल 80 हजार रुपये उकळायची, असे तपासात निष्पन्न झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Maldives Underwater Meeting: मालदीवमध्ये समुद्राच्या खोल पाण्यात का झाली संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक?

तर अनेकांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान गुन्हे शाखा कक्षा आठला याची माहिती समजली असता त्यांनी मरीन लाईन्स येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर धाड टाकली आणि दोन आरोपींना अटक केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

घर आणि रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देत ३४ लाखांचा गंडा

दरम्यान, याआधी डोंबिवलीमध्ये एका व्यक्तीला 34 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन 34.78 लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका जोडप्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित व्यक्ती आणि त्याच्या बहिणीला म्हाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुतण्याला रेल्वेत नोकरी देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. याप्रकरणी अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com