Parenting Tips : Online Gaming मुळे बिघडतेय मुलांचे मानसिक आरोग्य, पालकांनो या गोष्टी लक्षात ठेवाच!

How To Save kids From Online Gaming : सध्या ऑनलाइन गेमिंगचे क्रेझ लहान मुलांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या शरीरासोबत मनावर देखील परिणाम होत आहे.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Child Online Game Addiction :

हल्ली व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. वाढत्या वयात मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती, पालकांची. अशावेळी पालकांनी सहकार्य केले नाही की, मुले वाईट मार्गाला लागतात.

सध्या ऑनलाइन (Online) गेमिंगचे (Game) क्रेझ लहान मुलांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या शरीरासोबत मनावर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे हे पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुलांना स्मार्टफोनसोबत ऑनलाइन गेमिंगचे इतके व्यसन लागले आहे की, त्यामुळे ते अभ्यास देखील करत नाही. त्यांची ही सवय पालकांना (Parents) मोडायची असेल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

1. संवाद साधा

बरेचदा मुले ऑनलाइन गेम खेळत असताना पालक त्यांच्यावर रागवतात. त्यामुळे मुले हट्टाला पेटून गुपचूप गेम खेळू लागतात. त्यांच्यावर रागवण्याऐवजी त्यांच्याशी सविस्तर बोला. त्यांच्याशी नीट शांतपणे संवाद साधा.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांनो, या ६ गोष्टींवरुन कळेल तुमचे आणि मुलांच्या नात्यातील अंतर, चुकूनही दुर्लक्ष करु नका

2. रुटीन सेट करा

पालकांना मुलांचे डेली रुटीन माहित असायला हवे. अनेकवेळा पालक दिवसभर काय करतात हे मुलांना माहित नसते. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा. त्यांचा खेळण्याचा टाइम सेट करा. तसेच तुमच्यासोबत वेळ घालवता येतील अशा गोष्टी त्यांच्याकडून करुन घ्या.

3. रेटिंग पाहा

Google Play Store वरुन जर तुमचे मुल गेम खेळत असेल तर त्याचे रेटिंग तपासा. तसेच त्या गेमची वयोमर्यादा किती आहे हे देखील पाहायला हवे. ज्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे की, नाही हे कळेल.

Parenting Tips
Parenting Tips : मुलं सतत रागराग-चिडचिड करतात? पालकांनो, या टिप्स फॉलो करा; मूड राहिल नेहमी आनंदी

4. हिंसक खेळ नको

बरेचदा मुले हिंसक किंवा मारामारीचे खेळ खेळतात. यामुळे त्यांच्या बालमनावर परिणाम होतो. बंदूक-चाकू सारखे गेम्स त्यांना खेळू देऊ नका.

5. स्वत:कडे लक्ष द्या

जर मुले ऑनलाइन गेम्स खेळत असतील आणि तुम्ही त्यांना दूर राहायला सांगत असाल तर तुम्ही देखील तुमच्या फोनपासून लांब राहा. अन्यथा मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com