Parenting Tips : पालकांनो, या ६ गोष्टींवरुन कळेल तुमचे आणि मुलांच्या नात्यातील अंतर, चुकूनही दुर्लक्ष करु नका

Parents Child Bond : वाढत्या वयात मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती पालकांची. चांगल्या वाईट गोष्टींचा त्यांचा शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. मुले त्यांच्या भावना शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीतून व्यक्त होतात. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv
Published On

Child Care Tips :

वाढत्या वयात मुलांना सगळ्यात जास्त गरज असते ती पालकांची. चांगल्या वाईट गोष्टींचा त्यांचा शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतो. मुले त्यांच्या भावना शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीतून व्यक्त होतात. त्यामुळे त्यांची चिडचिड होते.

मुलांना जेव्हा पालकांची (Parents) गरज असते तेव्हा त्यांना भावना शब्दात सांगता येत नाही किंवा वागण्यातून व्यक्त करतो. अशावेळी पालकांनी त्यांना समजून घेणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी ६ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1. वेळ द्या

मुले (Child) वारंवार तुम्हाला त्यांच्यासोबत खेळण्याचा आग्रह करत असेल तर त्यांच्या सोबत खेळा. त्यांच्यासोबत वेळ (Time) घालावा. ज्यामुळे त्यांना तुमचा अभिमान वाटेल. ते तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातील.

2. सहकार्य करा

जर तुम्ही कामात असाल तेव्हा अशावेळी मुलांना मदत करायला सांगा. त्यांना नवीन गोष्टी शिकवा. तुमच्यासोबत काम केल्याने तुमचा वेळ त्यांना मिळेल. त्यांचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व देखील वाढेल. भावनिदृष्ट्या ते तुमच्याशी अधिक जोडले जातील.

Parenting Tips
Parenting Tips : मुलं सतत रागराग-चिडचिड करतात? पालकांनो, या टिप्स फॉलो करा; मूड राहिल नेहमी आनंदी

3. सतत रडतात

मुलाला काय हवे आहे हे फक्त पालकच समजू शकतात. पालकांकडून मुलांना जास्तीत जास्त प्रेम हवे असते. त्यांच्या रडण्याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर त्यांना मिठी मारुन शांत करा

4. लक्ष द्या

मुलांच्या प्रत्येक लहान गोष्टीत पालकांना लक्ष द्यायला हवे. त्यामुळे ते अधिक प्रेरित, उत्साही होतात. ते खेळत असतील, अभ्यास करत असतील तेव्हा त्यांची स्तुती करा. तुम्ही त्यांच्यासोबत आहात याची त्यांना जाणीव करुन द्या

5. आक्रमक होतात

मुलांना पालकांचा पुरेसा वेळ मिळाला नाही तर ते अधिक चिडचिड किंवा रागराग करु लागतात. त्यांच्या मनात आक्रमकतेची भावना निर्माण होते. यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत आहात हे त्यांना वेळोवेळी सांगा.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांनो, या ५ लक्षणांवरुन कळेल मुलांना हवे एक्स्ट्रा अटेंशन, वेळीच द्या लक्ष

6. भावनिकदृष्ट्या मजबूत होणे

जर मुले सतत तुमच्या मागे पुढे करत असतील तर त्यांना तुमचा सहवास अधिक जास्त हवा असतो. अशावेळी मुलांच्या जवळ बसा त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना जवळ घ्या. त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com