Parenting Tips : पालकांनो, या ५ लक्षणांवरुन कळेल मुलांना हवे एक्स्ट्रा अटेंशन, वेळीच द्या लक्ष

Parents Guide : कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसोबत अधिक वेळ घालवता येत नाही. त्यामुळे मुलांच्या स्वभावात अनेक बदल होऊ लागतात. कामाच्या गडबडीत पालक बरेचदा मुलांकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.
Parenting Tips
Parenting TipsSaam tv
Published On

5 Sings Kids Needs More Attention :

कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना मुलांसोबत अधिक वेळ घालवता येत नाही. त्यामुळे मुलांच्या स्वभावात अनेक बदल होऊ लागतात. कामाच्या गडबडीत पालक बरेचदा मुलांकडे दुर्लक्ष करतात. ज्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

त्यामुळे मुले पालकांनी (Parents) आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठी अनेक गोष्टी करतात. यावेळी पालकांनी लक्ष दिले नाही तर मुलांच्या स्वभावात अनेक बदल घडतात, त्यांची चिडचिड होते, ते अधिक रागीष्ट देखील होतात. जाणून घेऊया.

1. भावंडांचा तिरस्कार

कुटुंबात जर दोन मुले (Kids) असतील तर दोघांकडे एकाच वेळी लक्ष देता येत नाही. त्यामुळे मोठ्याला लहानाचा हेवा वाटू लागतो. त्यामुळे तो सतत आपल्या भावंडांशी भांडण करतो. त्याचा तिरस्कार करतो.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांच्या या वाईट सवयी कमी करतात मुलांचा आत्मविश्वास, तुम्हीदेखील ही चुक करत नाही ना?

2. सतत राग राग करणे

जेव्हा पालकांचे लक्ष मुलांकडे जात नाही तेव्हा ते रागराग करतात. ज्यामुळे पालकांचे लक्ष मुलांकडे जाईल. अशावेळी मुले अधिक आक्रमक होतात. इकडे-तिकडे वस्तू फेकून देतात.

3. चुकीच्या शब्दांचा वापर

मुलांकडे पालकांचे लक्ष नसेल तर त्यांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. जी कधी कधी त्यांच्या शब्दातून जाणवते. त्यासाठी ते पालकांना सतत उलट शब्दात किंवा ओरडून बोलतात.

4. दूर असताना रडणे

पालकांपासून दूर असल्यावर मूले जास्त संवेदनशील असते. तुमच्या जवळ राहाण्याचा ते अधिक प्रयत्न करते. ज्यावेळी पालक मुलांपासून लांब असतात तेव्हा ते रडायला लागतात.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांना लागलेली मोबाईल पाहण्याची सवय कशी मोडणार? सोप्या टिप्स फॉलो करा

5. ओवर अॅक्टिंग

मुलांना पालकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते तेव्हा ते अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देतात. आजारी (Health) पडल्यावर ते रडू लागतात. थोडीशी दुखापत झाल्यावर मोठ्याने ओरडू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com