आजकाल प्रत्येक पालकांची तक्रार असते की, शाळेतून किंवा खेळून आल्यानंतर मुलांना सर्वात आधी फोन हवा असतो. परंतु, ही सवय मुलांना लागते ती पालकांकडूनच. सध्याच्या डिजिटल युगात पालक जितक्या मोबाईलच्या आहारी गेले आहेत त्याच्या दुप्पट मुलं देखील गेले आहेत.
मुलं सतत मोबाईल (Mobile), टॅबलेट, टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप यासारख्या गोष्टीमध्ये मग्न असतात. शारीरिक क्रियाकलप करण्यात त्यांना कोणताही रस नसतो. मुले घरी आली की त्यांना गॅजेट्सशिवाय काहीही दिसत नाही. अशावेळी पालकांना (Parents) प्रश्न पडतो की, मुलांना मोबाईलपासून कसे दूर ठेवायचे? ही सवय त्यांची कशी मोडायची? त्यासाठी या सोप्या टिप्स (Tips) फॉलो करु शकता.
1. आर्ट अँड क्राफ्ट
मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना ड्राइंग, पेटिंग, क्ले आर्ट, पेपर क्राफ्ट हा एक चांगला पर्याय आहे. यापद्धतीने तुम्ही मुलांना व्यस्त ठेवू शकता.
2. पुस्तके वाचण्याची सवय
मुलांना वाचनाची गोडी लावा. तसेच तुम्ही त्यांना स्टोरी बुक किंवा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी वाचायला देऊ शकता. यामुळे त्यांना वाचनाची सवय लागेल.
3. स्वयंपाकघरात मदत
मुलांना स्वयंपाकघरात मदत करायला सांगा. त्यांना भाजी आणण्यापासून ते बाजारातून सामान आणण्यापर्यंतच्या घरातील छोट्या-छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घेऊ शकता.
4. स्मरणशक्ती
मुलांना मोबाईलच्या सवयींपासून सोडवण्यासाठी त्यांना काही गेम्स खेळायला द्या. त्यांच्या मेंदूला चालना मिळेल, अशा गेम्समध्ये त्यांना सहभागी करुन घ्या. रुबिक्स क्यूब, ब्रेन गेम्स, वर्ड गेम्स, क्रॉसवर्ड पझल, मॅथ आणि लॉजिकल पझल असे गेम्स त्यांना खेळायला देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.