Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : मुले अभ्यास करताना कंटाळा करतात? कशी हँडल कराल ही Situation

How To Handel Child Study Tantrums : मुलं शाळेत जाऊ लागली पालकांना अधिक टेन्शन येते. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी असते. याचे कारण मुलांच्या भविष्याबाबतचा ताण जो प्रत्येक पालकांवर येतो. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षणाची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
Published on

Child Care Tips :

वाढत्या वयात प्रत्येक पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. मुलांनी हट्टीपणा केला की, पालकांना तो पुरवावा लागतो. पालकतत्व स्विकारताना अनेक जबाबदाऱ्या येतात. ज्या कधी कधी पूर्ण करताना नाकी नऊ येतात.

मुलं (Child) शाळेत जाऊ लागली पालकांना अधिक टेन्शन येते. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी (Care) असते. याचे कारण मुलांच्या भविष्याबाबतचा ताण जो प्रत्येक पालकांवर येतो. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी शिक्षणाची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

मुले लहान असताना सतत व्हिडीओ गेम्स, टीव्ही किंवा खेळात आपला वेळ घालवतात. अशा परिस्थतीत पालकांना (Parents) त्यांच्या चांगल्या भविष्याची चिंता वाटू लागते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा दबाव टाकू लागतात. मूल अनेकदा अभ्यासापासून दूर जात असेल आणि अभ्यास करताना राग दाखवत असेल, तर तुम्ही या समस्येला काही मार्गांनी सहजपणे सामोरे जाऊ शकता.

1. शिक्षणाचे महत्त्व

मुल ही अधिक निरागस असतात. त्यांना बालवयात शिक्षणाते महत्त्व कळत नाही. अशावेळी पालकांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगा.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांनो, हिवाळ्यात मुलांचे थंडीपासून कसे कराल संरक्षण? अशी घ्या काळजी

2. प्रयत्नांचे कौतुक करा

मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून मूल जे काही अभ्यासाशी संबंधित करते. किंवा जे काही तुम्हाला दाखवेल त्याला नक्की प्रोत्साहन द्या.

3. आहाराची काळजी घ्या

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांच्या आहाराची काळजी घ्या. मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना नेहमी निरोगी पदार्थ खाऊ घाला.

4. पुरेशी झोप घ्या

मुलांनी काहीही खाल्ल्यानंतर त्यांना झोप येते. त्यांचा मेंदू निरोगी राहील अशा गोष्टी काळजी घ्या. नाहीतर ते सतत थकल्यासारखे आणि अशक्त वाटतील.

Parenting Tips
Parenting Tips : डिअर, मॉम-डॅड या सवयींमुळे मुलं होतात हट्टी, तुम्हीही करता का ही चूक?

5. योगासने

प्रत्येकाला चांगल्या आरोग्यासाठी योग आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. लहान असो किंवा प्रौढ त्यांना शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाण्याबरोबरच मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतात, ज्यामुळे त्यांना अभ्यास करण्यास अधिक उत्साह राहातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com