DIY Coconut & Aloe Vera Hair Serum for Soften and Nourish Your Hair Naturally  Freepik/william robert salon
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केस राठ झाले आहेत? नारळाचे तेल आणि कोरफडपासून बनवा घरच्या घरी हे नैसर्गिक हेअर सीरम

Make Natural Hair Serum At Home : राठ आणि कोरडे केस झाले आहेत? मग घरीच बनवा नारळाच्या तेल व कोरफडीपासून हे नैसर्गिक हेअर सीरम. हे केसांना पोषण देतं आणि त्यांना मुलायम बनवतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या सर्वांनाच शायनी आणि हेल्दी केस हवे असतात. कामाच्या व्यस्थतेमुळे हेअर केअर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशात पार्लरमध्ये जाऊन हेअर केअर करायचे म्हटले तर, काहीवेळा ते परवडणारे नसते. अनेक स्त्रिया महागडे हेअर प्रोडक्ट्स वापरत असतात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे केसांना नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. यापासून वाचण्यासाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी नैसर्गिक हेअर सीरम बनवू शकता.

केसांची निगा राखण्यासाठी नारळाचे तेल आणि कोरफड हे सर्वोत्तम पर्याय मानले जातात. नारळाचे तेल केसांच्या खोलवर जाऊन केसांना मॉईश्चराईज करते. तसेच केसांच्या मुळांमध्ये चांगल्या प्रकारे मुरते आणि मुळांमध्ये असलेले नैसर्गिक तेल टिकवून ठेवते. तसेच कोरफडमध्ये थंड गुणधर्म असतात. जे टाळूवर होणारी जळजळ शांत करतात. शिवाय केसांना हायड्रेशन मिळवून देतात आणि केस अधिक शायनी आणि मऊ बनवतात. या दोन्ही पदार्थांमध्ये असलेले अँटीफंगल गुणधर्म केसात कोंडा होण्यापासून रोखतात.

हे नैसर्गिक हेअर सीरम कसे बनवाल?

१. एक हवा बंद लहान डबी किंवा बाटली घ्या.

२. त्यात दोन चमचे नारळाचे शुद्ध तेल घ्या.

३. दोन चमचे कोरफड ताजा अर्क किंवा जेल घ्या.

४. चांगल्या प्रकारे एकजीव करा. हेउर सीरम तयार आहे.

कसे वापराल?

१. हे हेअर सीरम केस धुवून झाल्यानंर वापरू शकता.

२. केस पूसुन घ्या.

३.थोडे सीरम केसांच्या मध्यभागापासून शेवटपर्यंत लावा.

४. मोठ्या आणि जाड दातांच्या फणीने केस विंचरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT