SNAKE ALERT APP FOR FARMERS: MOBILE WARNING SYSTEM TO HELP PREVENT SNAKE BITES DURING MONSOON 
लाईफस्टाईल

शेतात साप असेल तर मोबाईलवर येईल अलर्ट; 'या' अ‍ॅपमुळे वाचेल शेतकऱ्यांचा जीव

Snake Alert On Your Mobile: : पावसाळ्यात शेतात किंवा घराजवळ साप असल्यास मोबाईलवर आगाऊ सूचना देणाऱ्या नव्या अॅपची माहिती जाणून घ्या. सर्पदंशापासून बचाव, तातडीची मदत आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अॅप कसे उपयुक्त ठरणार?

Bharat Jadhav

  • पावसाळ्यात शेतात साप असल्याची आगाऊ सूचना मोबाईलवर देणारे अॅप उपलब्ध.

  • शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सर्पदंशापासून बचावाचे प्रभावी साधन ठरणार.

  • सर्पदंश झाल्यास उपचार आणि तातडीच्या मदतीसाठीही अॅपमध्ये मार्गदर्शन मिळणार

पावसाळ्यात घरांमध्ये किंवा शेतात साप आढळणे ही एक सामान्य बाब आहे, परंतु अशा वेळी सापाचा सामना करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. विषारी साप चावला तर जीव देखील जाऊ शकतो. मात्र आपण अशा एका ॲपबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे शेतात किंवा घरात साप असल्यास कळून येईल.

पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नदी नाल्यांना येणारा पुरासह साप निघणं देखील एक मोठी चिंतेची बाब ठरत असते. दरवर्षी देशभरात हजारो लोक सर्पदंशाला बळी पडतात आणि त्यामध्ये शेतकरी व ग्रामीण भागातील रहिवाशांची संख्या मोठी असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक मोबाइल ॲप मदत करणार आहे. जे शेतकऱ्यांना सापांपासूनच्या धोक्यांबाबत आगाऊ सूचना देऊ शकते. शिवाय, सापाचा दंश झाल्यास, उपचार आणि मदत मिळवून देण्यात हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावते.

हे ॲप काय आहे?

SERPENT (Snake Emergency Response Programme & Response Tool). हे एक मोबाईल ॲप आहे, जे सापविषयक आणीबाणीच्या प्रसंगी आणि साप चावण्याच्या घटनांच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे ॲप सापांची ओळख, साप चावण्यापासून बचाव, जवळची रुग्णालये आणि प्रशिक्षित सर्पमित्र यांविषयीची माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देते. हे सर्वसामान्य जनतेसोबतच शेतकरी, वनक्षेत्रात काम करणारे आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त मानले जाते.

घरात साप असेल तर मिळेल अलर्ट

शेत, गाव आणि जंगलालगतच्या परिसरामध्ये साप आढळण्याची शक्यता अधिक असते. ॲपवरील स्थानविषयक माहिती आणि अहवाल शेतकऱ्यांना सापांचे दर्शन घडलेल्या जवळच्या ठिकाणांची ओळख पटवण्यास मदत करतात. यामुळे शेतात काम करण्यापूर्वी अधिक खबरदारी घेणे शक्य होते. तसेच धोका कमी करण्यास मदत मिळते. मात्र, हे ॲप प्रत्येक सापाच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत सूचना देत नाही; त्याऐवजी, ते साप आढळल्याच्या नोंदी आणि उच्च-धोक्याच्या क्षेत्रांविषयी माहिती पुरवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : शरीरात ही ९ लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका, गंभीर समस्यांचे मिळतात संकेत

आई बाजारात फळं विकत राहिली अन् तिकडे एकुलत्या एक मुलानं घेतलेली एक्झिट... बदलापूर हादरलं

Maharashtra News Live Update: प्रसाद लाड यांचं मनोज जरांगे पाटलांकडून कौतुक; 'बिगर मिशीचा' म्हणत दरेकरांना टोला

Shocking: एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह तलावात आढळले, आई अन् ४ मुलांसोबत भयंकर घडलं

Pickle Side Effect: रोजच्या जेवणात लोणचं खाताय? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ ७ गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT