Smartphone Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Side Effects : सावधान! दीड तासांपेक्षा जास्त वेळ फोन वापरताय? जडू शकतो हा गंभीर आजार

कोमल दामुद्रे

Smartphone Affect Health :

आजकाल स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात एक महत्त्वाचा भाग बनला आहे. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण फोन तासन्तास चाळत बसतो. सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो.

परंतु, जर तुम्हीदेखील दीड तासांपेक्षा अधिक वेळ फोनचा वापर करत असाल तर आरोग्याला नुकसान होऊ शकते. स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळे अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. दिवसभरात दीड तासांपेक्षा अधिक वेळ फोन वापरल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे शरीरावर कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊया.

1. डोळ्यांची समस्या

स्मार्टफोनच्या (Smartphone) अतिवापरामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या उद्भवते. विशेषत: ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. फोनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मुलांच्या डोळ्यांवर (Eye) परिणाम करतो. ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. तसेच डोळे दुखणे, डोळे लाल होणे अशा समस्या दिसू लागतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रासही होत आहे.

2.हाड दुखणे

डॉक्टरांनी सांगितले की, तासनतास फोन वापरल्याने संधिवाताची समस्या उद्भवू शकते. तसेच यामुळे मनगट आणि कोपर दुखतात. हे दुखणे कायम राहिल्याने संधिवात होण्याचा धोका असतो. ही समस्या प्रोढांसोबतच लहान मुलांमध्येही (Kids) दिसून येत आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना अधिक काळजी घ्यायला हवी असे डॉक्टरांचे मत आहे.

3. मानसिक आरोग्यावर परिणाम

स्मार्टफोनचा अनावश्यक वापर टाळावा. टाईमपास करण्यासाठी लोक तासन्तास फोनचा वापर करताना दिसून येतं आहे. परंतु, दीड तासांपेक्षा अधिक वेळे त्याचा वापर केल्यास मानसिक ताण येतो. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो.

4. झोपेची चुकीची पद्धत

फोनच्या अतिवापरामुळे झोपेचा पॅर्टन खराब होतो. त्यामुळे निद्रानाशाची समस्या होते. रात्री फोनचा अतिवापर केल्यामुळे झोपेचे त्रास कमी होतात. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. कमी झोपेमुळे डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्याही उद्भवत आहेत. त्यामुळे स्मार्टफोनपासून थोडा ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT