Infinix Pro 14 Features Information in Marathi Infinix pro 14
लाईफस्टाईल

Budget SmartPhone : बजेटवाला Infinix pro 14 स्मार्टफोन; मार्केटमध्ये खास कॅमेऱ्यासह इतर फिचर्सची आहे फूल चर्चा

Infinix pro 14 Features: कमी पैशात चांगला स्मार्टफोन ज्यांना हवा असेल अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. येत्या ८ डिसेंबरपासून बाजारात हा मोबाईल फोन उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे.

Bharat Jadhav

Budget Infinix Pro 14 Information:

Budget Smartphone : Infinix हा मोबाईल फोनसुद्धा सुपर फीचर देण्यात सरस आहे. सुपर फीचर तेही अगदी कमी किमतीत. कमी पैशात चांगला स्मार्टफोन ज्यांना हवा असेल अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. हा फोन बाजारात कोणत्या तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल हे निश्चित नसले तरी या फोनच्या फिचर्सची चर्चा मोठी होत आहे. (Latest News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्मार्ट ७ सीरिजच्या यशानंतर कंपनीने ही सीरिज बाजारात आणलीय. परंतु या फोनशी संबंधित संपूर्ण माहिती कंपनीने अद्याप शेअर केलेली नाहीये. येत्या ८ डिसेंबरपासून बाजारात हा मोबाईल फोन उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे. Infinix च्या नवीन स्मार्टफोनच्या लाँचमुळे ग्राहक उत्सुक आहेत. Infinix 14 pro आपल्या यूजर्ससाठी काही खास फीचर्स देखील आणणार आहे. स्मार्ट सीरिजमध्ये पहिल्यांदाच हे फीचर लाँच केले जाणार आहेत.

काय असतील फिचर्स

हाती आलेल्या माहितीनुसार, फोन १०८० x २४०० पिक्सेल्सच्या रिझोल्यूशनसह ६.९ इंच (17.53 सेमी) भव्य डिस्प्लेसह येणार असल्याची चर्चा बाजारात आहे. या फोनमध्ये मॅजिक रिंगमध्ये फेस अनलॉक, बॅकग्राउंड कॉल्स मॅनेज करणं, डिस्प्ले चार्जिंग अॅनिमेशन यासह अनेक फिचर्स देण्यात आली आहेत. कंपनी दोन प्रकारात हा स्मार्टफोन आणणार आहे.

या व्यतिरिक्त, हा मोबाईल फोनला ४ GB रॅम देण्यात आलीय. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकापेक्षा जास्त अॅप्स ओपन करू शकतात. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये स्टोरेज क्षमता देखील मोठी देण्यात आलीय. या १२८ GB अंतर्गत स्टोरेज देण्यात येण्याची शक्यता आहे. Infinix कडून येणारा हा मोबाईल Android v१२ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा असून यात ६००० mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे.

दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे तुम्ही कितीही गाणे ऐकली किंवा व्हिडिओ पाहिला तरी मोबाईलची बॅटरी उतरणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तुम्हाला जर फोटोग्राफीचा छंद असेल तर या कंपनीचा फोन तुमच्यासाठी भारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये रिअल सिंगल कॅमेरा सेटअप असू शकतो. हा कॅमेरा 108 MP + 8 MP + 5 MP असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT