अलीकडच्या काळात शहरांमध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. अनेकदा लोक लहान जखम किंवा किरकोळ चावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तज्ज्ञांच्या मते, हीच गोष्ट पुढे गंभीर ठरू शकते. कारण रेबीज हा आजार लक्षणं दिसल्यानंतर प्राणघातक ठरू शकतो.
नोएडातील डॉक्टर डॉ. श्रद्धेय कटियार यांनी सोशल मीडियावरून लोकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. 'लक्षणांची वाट पाहू नका, लगेच कृती करा,' असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. विशेष म्हणजे, प्रत्येक चाव्याचा प्रकार रेबीजचा धोका मानूनच उपचार सुरू करावेत, असंही त्यांनी सांगितलं.
कुत्रा चावल्यानंतर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखम स्वच्छ करणं. जखम वाहत्या पाण्याखाली साबणाने किमान १५ मिनिटं धुवावी. असं केल्याने विषाणू बाहेर पडण्यास मदत होते आणि इन्फेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
जखम स्वच्छ केल्यानंतर पोविडोन-आयोडीन किंवा क्लोरहेक्सिडीनसारखं अँटीसेप्टिक लावणं आवश्यक आहे. जखम लगेच घट्ट पकडणं टाळावं.
डॉक्टरांच्या मते, डॉग बाइटचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यानुसार उपचार करणं योग्य असतं.
कॅटेगरी II मध्ये लहान ओरखडे किंवा रक्त न येणारे चावे येतात.
कॅटेगरी III मध्ये त्वचा फाटणं, रक्त येणं किंवा लाळ जखमेवर लागणं यांचा समावेश होतो.
जर कुत्र्याची माहिती उपलब्ध नसेल, तर सुरक्षिततेसाठी कॅटेगरी III म्हणूनच उपचार सुरू करणं योग्य ठरतं.
कुत्रा चावल्यानंतर त्वरित रेबीजचं लसीकरण सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे. साधारणपणे ०, ३, ७ आणि १४ व्या दिवशी डोस दिले जातात. काही वेळा २८ व्या दिवशीही अतिरिक्त डोस दिला जाऊ शकतो.
गंभीर जखमांमध्ये रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) देणं गरजेचं असतं. हे इंजेक्शन थेट जखमेच्या आसपास दिलं जातं, ज्यामुळे तात्काळ संरक्षण मिळतं.
कुत्र्याच्या चाव्यामुळे टिटॅनसचा धोका देखील निर्माण होतो. त्यामुळे टिटॅनसचं इंजेक्शन वेळेवर घेणं गरजेचं आहे. काही गंभीर जखमांमध्ये इम्युनोग्लोब्युलिनचीही गरज भासू शकते. त्याचप्रमाणे अशा जखमांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे डॉक्टर अमॉक्सिसिलिन-क्लॅव्ह्युलनेटसारखी अँटिबायोटिक्स देतात.
जर चावलेला कुत्रा १० दिवसांपर्यंत निरोगी राहिला तर रेबीजचा धोका कमी मानला जातो. मात्र, त्या काळात कुत्रा आजारी पडला किंवा मृत्यू झाला, तर उपचार अजिबात थांबवू नयेत.
लहान चावा किंवा ओरखडा म्हणून दुर्लक्ष करू नका
घरगुती उपायांवर विश्वास ठेवू नका
लसीकरण उशिरा करू नका
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.