Sleeping Vastu Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Sleeping Vastu Tips : झोपताना उशीखाली चुकूनही 'या' वस्तू ठेवू नका; अन्यथा लक्ष्मी देवी कायमची पाठ फिरवेल

Do Not Keep These Things in Pillow : लक्ष्मी देवी कायम आपल्यावर प्रसन्न रहावी यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही पुजा अर्चा करत असतात. मात्र अनेकदा आपल्या हातून काही चुका घडतात आणि त्यामुळे धनलक्ष्मी आपल्यावर नाराज होते.

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात माता लक्ष्मी देवीला फार महत्व आहे. ज्या व्यक्तीवर या देवीची कृपा असते त्यांना आयुष्यात धनसंपत्तीसाठी कधीच तुटवडा भासत नाही. लक्ष्मी देवी कायम आपल्यावर प्रसन्न रहावी यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही पुजा अर्चा करत असतात. मात्र अनेकदा आपल्या हातून काही चुका घडतात आणि धनलक्ष्मी आपल्यावर नाराज होते. त्यामुळे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती जाणून घेऊ.

दागिने

अनेक व्यक्ती विशेषता महिला आपले दागिने झोपण्याआधी काढून ठेवतात. दागिने झोपेत तुटण्याची शक्यता असते त्यामुळे झोपण्याआधी ते काढून ठेवले जातात. झोपताना रात्री दागिने कुठे हरवूनयेत म्हणून काही महिला ते उशी खाली लपवून ठेवतात. मात्र उशी खाली सोने आणि चांदीचे दागिने कधीच ठेवू नयेत. कारण त्याने धनलक्ष्मी नाराज होते. ज्या व्यक्ती असे करतात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

चावी

घरात जी महिला प्रमुख असते तिच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतात. झोपताना बहुतेक महिला या चाव्या उशीखाली ठेवतात. मात्र असे करणे चूक आहे. चाव्या शक्यतो तिजोरीच्या असतात. त्यामुळे आपल्यावर आर्थिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो.

इलेक्ट्रीक वस्तू

काही व्यक्तींना झोपेत फोन किंवा काही गेम्सच्या वस्तू स्वत:जवळ ठेवण्याची सवय असते. अनेक व्यक्ती फोनमध्ये अलार्म लावून तो फोन आपल्या बिछान्यावरच ठेवतात. मात्र असे केल्याने तुमच्याकडे असलेली सर्व धनसंपत्ती हळूहळू कमी होत जाते. असे केल्याने गॅजेटमधील रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सर्व पैसे आरोग्यावर खर्च होतात.

पुस्तक

काही व्यक्तींना झोपताना पुस्तक वाचण्याची सवय असते. पुस्तक वाचणे चांगली गोष्ट आहे. मात्र वाचत असताना अचानक झोप लागली आणि तुम्ही पुस्तक उशी जवळ ठेवून झोपलात तर ते चूक आहे. झोपताना पुस्तक कधीच उशी जवळ ठेवू नये. वाचून झाल्यावर पुस्तक त्याच्या ठिकाणी ठेवावे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT