Office Vastu Tips : अशा पद्धतीने सजवा ऑफिसचा डेस्क; बॉस करेल कौतुक, धनलक्ष्मी कायम प्रसन्न राहील

Vastu Tips Office Employee : डेस्क छान ठेवणे हे आपल्याच हातात असते. त्यामुळे तुम्ही डेस्क मस्त ठेवल्यास तुमच्या बॉसला सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक वाटू लगतं.
Vastu Tips Office Employee
Office Vastu Tips Saam TV
Published On

ऑफिसमध्ये आपण काम करतो आणि याच ऑफिसमधून आपला उदरनिर्वाह होत असतो. कामावर गेल्यानंतर दररोज एकच काम करून अनेक व्यक्तींना कंटाळा येतो. मात्र ऑफिसमध्ये सर्व सुखसोयी व्यवस्थित असतील तर प्रत्येक व्यक्तीला येथे काम करत राहण्याची इच्छा होते. अशावेळी कामाचा कंटाळा येत नाही. आपण आपल्या क्षमतेपेक्षा थोडं जास्तीचं काम देखील करतो.

Vastu Tips Office Employee
Government Job Employee: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी!

ऑफिस व्यवस्थित नसेल कर कुणालाही काम करावे वाटत नाही. आता ऑफिस कसेही असले तरी येथे काम करताना आपला डेस्क सुद्धा चांगला आणि छान असला पाहिजे. डेस्क छान ठेवणे हे आपल्याच हातात असते. त्यामुळे तुम्ही डेस्क मस्त ठेवल्यास तुमच्या बॉसला सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक वाटू लगतं.

कलरफुल वस्तू

डेस्क सुंदर आणि आकर्षक वाटावा यासाठी तुम्ही येथे विविध रंगिबेरंगी वस्तू ठेवू शकता. यामध्ये मार्कर, स्केचपेन किंवा मग स्टॅप्लर अशा वस्तू तुम्ही ठेवू शकता. ब्राइट वस्तू असल्यास त्याचा आपल्या डेस्कवर सकारात्मक परिणाम होतो.

झाडे लावा

ऑफिसमधील डेस्क आणखी छान वाटावा यासाठी तुम्ही येथे झाडे लावू शकता. बाजारात अशी अनेक छोटी छोटी झाडे आहेत जे सूर्यप्रकाश पुरेसा मिळाला नाही तरी मस्त फुलतात आणि वाढतात. अशी झाडे तुम्ही तुमच्या डेस्कवर लावून ठेवू शकता. त्याने डेस्कवर सकारात्मक ऊर्जा फिरत राहते. मन प्रसन्न राहते आणि ताण तणाव कमी होतो.

प्रेरणा देणारे कोट्स

आपल्या कामात आपण कितीही हुशार असलो तरी सुद्धा आपल्याला एक ना एक दिवस बोरिंग वाटते. अशावेळी आपल्या डेस्कवर काही प्रेरणा देणारे कोट्स असावेत. त्यामुळे सुद्धा आजच आपल्या डेस्कवर असे कोट्स लिहून ठेवा. डेस्क छान असल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच पैशांची अडचण येत नाही.

फोटो फ्रेम

कामामध्ये अनेकवेळा वाद किंवा भांडणे होतात. आपल्याला अशावेळी आपल्या जवळच्या व्यक्तींची गरज असते. त्यामुळे डेस्कवर फोटो फ्रेम लावा. फोटो फ्रेममध्ये तुमच्या कुटुंबातील जवळच्या आणि प्रिय व्यक्तींचे फोटो ठेवा. असे केल्याने तुम्हाला अडचणीत त्यांचे फोटो पाहून थोडं बरं वाटेल आणि काम करण्याची इच्छा होईल.

Vastu Tips Office Employee
Government Employees Video: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सुधारित पेन्शन योजना १ मार्चपासून लागू होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com